संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:13 AM2017-09-25T01:13:19+5:302017-09-25T01:13:24+5:30

देशात काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती तर काही ठिकाणी अतिवृष्टी या नैसिर्गक संकटाने बळीराजा धास्तावला आहे. या नैसिर्गक संकटातुन देशाला वाचव. असे साकडे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भगवान त्र्यंबकेश्वराला घातले.

Defense Minister of State of Defense, Trimbakeshwar Darshan | संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

Next

त्र्यंबकेश्वर : देशात काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती तर काही ठिकाणी अतिवृष्टी या नैसिर्गक संकटाने बळीराजा धास्तावला आहे. या नैसिर्गक संकटातुन देशाला वाचव. असे साकडे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भगवान त्र्यंबकेश्वराला घातले.  येथील स्वामी समर्थ गुरु पीठात सुरु असलेल्या दुर्गा सप्तशती पीठाच्या पारायण समारोपा साठी आलेल्या भामरे यांनी भगवान त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. मंदीरात त्यांनी भगवान त्र्यंबक राजाला अभिषेक पुजा केली. पुजेचे पौराहित्य भाजप नेते संतोष भुजंग व सहकाºयांनी केले. त्यानंतर त्र्यंबक देवस्थानच्या कोठी हॉलमध्ये विश्वस्त कैलास घुले अ‍ॅड. श्रीकांत गायधनी आदींनी शाल श्रीफळ भगवान त्र्यंबक राजाची प्रतिमा भेट दिली. यानंतर डॉ. भामरे यांनी वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी मंदीरास भेट दिली.

Web Title: Defense Minister of State of Defense, Trimbakeshwar Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.