कर्मचाºयांची भूमिका ठरणार निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:44 AM2017-08-10T00:44:24+5:302017-08-10T00:44:30+5:30
नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पॅनलमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच दहा हजारापैकी निम्म्याहून अधिक मतदार हे मविप्र कर्मचाºयांच्या आणि शिक्षकांच्या सभासद असलेल्या मतदारांचे असल्याचे वृत्त आहे. याच सभासद मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची चर्चा सध्या निवडणुकीच्या प्रचारात सुरू आहे.
नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पॅनलमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच दहा हजारापैकी निम्म्याहून अधिक मतदार हे मविप्र कर्मचाºयांच्या आणि शिक्षकांच्या सभासद असलेल्या मतदारांचे असल्याचे वृत्त आहे. याच सभासद मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची चर्चा सध्या निवडणुकीच्या प्रचारात सुरू आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून काही आजी-माजी आमदारांनी या निवडणुकीकडे पाहण्यास सुरुवात केल्याचे समजते. ही राजकारणाची जागा नव्हे, असे सांगत विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांनी आजी-माजी लोकप्रतिनिधींना सूचक इशारा दिला होता. हाच इशारा जिव्हारी लागल्याने काही आजी-माजी लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या राजकीय अस्तित्वाची लढाई समजून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. मालेगावात राज्यमंत्री दादा भुसे हे सत्ताधारी पॅनलकडून तर माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे चिरंजीव माजी जिल्हा बॅँक संचालक अद्वय हिरे हे विरोधी पॅनलकडून निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. निफाडला आमदार अनिल कदम व माजी आमदार दिलीप बनकर यांनी सत्ताधारी व्यासपीठावर हजेरी लावत विधानसभेचे हाडवैर या निवडणुकीपुरता का होईना बाजूला ठेवल्याचे चित्र आहे. दहा हजार मतदारांपैकी सर्वाधिक मतदार हे निफाड, बागलाण व नाशिक शहरात असल्याने या तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या आजी-माजी लोकप्रतिनिधींची नेमकी मदत कोणाला होते, यावरच जय-पराजयाचे पारडे झुकणार आहे. त्यामुळे आता या आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरच सत्ताधारी आणि विरोधी पॅनलचे अस्तित्व अवलंबून असल्याची चर्चा आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेत नोकरीत असलेल्या कर्मचारी व शिक्षकांच्या नातलग मतदार सभासदांची संख्या तीन ते साडेतीन हजार आहे. या मतदारांंची मदत नेमकी कोणाला होते, यावरही विजयाचे गणित अवलंबून राहणार असल्याचे बोलले जाते.उरले ७२ तासमराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि.१३) मतदान होत असून, त्यासाठी आता तीन दिवस अर्थात ७२ तास उरले आहेत. या तीन दिवसांत प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचणार आहे. १४ आॅगस्टला लगोलग मतमोजणी व संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.