दुष्काळाच्या विरोधातील लढ्यात यश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:35 AM2018-05-18T00:35:51+5:302018-05-18T00:35:51+5:30
नाशिक : दुष्काळाच्या विरोधात उतरलेली पानी फाउण्डेशन आणि भारतीय जैन संघटना आता वेगळ्या राहिलेल्या नाहीत. दोन्ही संस्थांनी सुरू केलेल्या वाटचालीत सर्वसामान्य नागरिक व गावकऱ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग असल्याने दुष्काळाविरुद्ध सुरू केलेल्या या लढ्याला निश्चित यश प्राप्त होईल, असा विश्वास अभिनेते आमीर खान यांनी व्यक्त केला.

उत्तर महाराष्टÑातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील १३ तालुक्यांमध्ये दुष्काळमुक्त अभियान सुरू आहे. पानी फाउण्डेशनच्या या अभियानात जेसीबी, पोकलेन मशीन्स उपलब्ध करून देत भारतीय जैन संघटनेने सक्रिय सहभाग घेतला आहे. या पाच जिल्ह्यांतील भारतीय जैन संघटनेचे जिल्हा, तालुका प्रकल्प संचालक तसेच कार्यकर्त्यांचे चर्चासत्र धुळे येथे नुकतेच झाले. यावेळी अभिनेता आमीर खान यांनी मनमोकळा संवाद साधला. किरण राव यादेखील यावेळी उपस्थित होत्या. नाशिकचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला यांनी प्रास्ताविकात बीजेएसच्या कार्याची माहिती दिली व आदेश चंगेडिया यांनी स्वागत केले. दुष्काळमुक्त अभियानासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने मिळत असलेल्या सहकाºयाचा गौरवपूर्ण उल्लेख करून आमीर खान यांनी शांतिलालजी मुथ्था यांचे विचार ऐकल्यानंतर कामासाठी हिंमत वाढते, असेही ते म्हणाले.
बीजेएसचे जिल्हा प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, जळगावचे विनय पारख, नंदुरबारचे डॉ. कांतिलाल टाटिया, धुळे येथील विजय दुगड तसेच तालुका प्रकल्प संचालक प्रकाश छाजेड, सुभाष राका, रमेश चोरडिया, चंदन भळगट, सचिन कोठारी, चंद्रकांत भळघट, आशिष बोरा आदी उपस्थित होते.