लोक सहभागातुन कामे केल्यास गावाचा निश्चित विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 07:28 PM2019-06-06T19:28:11+5:302019-06-06T19:31:44+5:30
त्र्यंबकेश्वर : कुठलेही सार्व.काम लोक सहभागातुन केल्यास ते काम तडीस गेल्या शिवाय राहात नाही. आज आपण सर्वांनी मिळुन गावातील हा साठवण तलाव लोक सहभागातुन गाळ काढल्यामुळे तलावाची खोलीही वाढली आण िशेतीसाठी खतयुक्त सुपीक गाळ देखील मिळाला हे लोकसहभागातुनच घडले ना. असे प्रतिपादन नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ.सुरज मांढरे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री येथे केले. ते येथे गाळ मुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत पिंप्री येथील शिवारातील साठवण तलावातील गाळ काढण्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी तहसिलदार दीपक गिरासे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे जि.प.ल.पा.चे उपअभियंता भगवान वनमने तालुका कृषि अधिकारी अजय सुर्यवंशी श्रीमती गायकवाड खेडकर सरपंच दत्ता पारधी उपसरपंच प्रभाकर मुळाणे (संचालक नाशिक कृ.उ.बा.समतिी) निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त रामभाऊ मुळाणे ग्रामसेवक प्रकाश पवार आदी उपस्थित होते
पिंप्री येथील तलावातील गाळ काढुन लोकांनी तो शेतीसाठी वापरावा व साठवण तलावातील खोली वाढुन पाण्याचा साठाही वाढु शकेल या हेतुने लोकांना जाहीर आवाहन करु न या कामास प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी आयोजित केलेल्या औपचारिक कार्यक्र मात पिंप्री येथे तलावातील गाळ काढण्या बाबत ही संकल्पना राबविणारे जि.प.ल.पा.चे उप अभियंता भगवान वनमने यांनी अंमलात आणली. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बिहरु मुळाणे श्रीमती गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी अजय सुर्यवंशी यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी वनमने यांच्या कार्याचे कौतुक केले.