संरक्षित भिंतीच्या कामास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2015 10:21 PM2015-12-28T22:21:40+5:302015-12-28T22:22:11+5:30
संरक्षित भिंतीच्या कामास विलंब
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे घारपुरे घाटालगतच्या गोदावरी नदीपात्रातील भिंत कोसळून तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी भिंत बांधण्याच्या कामाला मुहूर्त लागला नसल्याने मनपा संरक्षित भिंतीच्या कामास विलंबप्रशासनाकडूनच कामाला विलंब होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
घारपुरे घाटालगतची भिंत नदीपात्रात कोसळली होती. या भिंतीबरोबर पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उभारलेले लोखंडी बॅरिकेडिंगही पाण्यात पडले होते; मात्र प्रशासनाने ना बॅरिकेडिंग पाण्याबाहेर काढले ना भिंत उभारणीचे नियोजन केले. सध्या या कोसळलेल्या भिंतीलगत केवळ पोलीस प्रशासनाचे दहा ते पंधरा लोखंडी बॅरिकेडिंग उभे करून नदीकाठ सुरक्षित केला आहे. अशोकस्ंतभ ते घारपुरे घाट दरम्यान दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांची कायमच वर्दळ सुरू राहते. सदरचा रस्ता वळणदार असल्याने वेगाने वाहन आल्यास व चालकाचा ताबा सुटल्यास वाहन लोखंडी बॅरिकेडिंगसह थेट नदीपात्रात कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)