पिकांच्या नुकसानभरपाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:25 AM2019-11-25T00:25:01+5:302019-11-25T00:25:27+5:30

परतीच्या पावसाने नाशिक तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक गावांमध्ये पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे.

 Delay in crop damage | पिकांच्या नुकसानभरपाईला विलंब

पिकांच्या नुकसानभरपाईला विलंब

Next

एकलहरे : परतीच्या पावसाने नाशिक तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक गावांमध्ये पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने पिके सडून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च अक्षरश: पाण्यात गेला. मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पाण्यात सडल्यामुळे पशुधनासाठी लागणाºया चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने सातत्य ठेवले. शेवटी शेवटी तर परतीच्या पावसाने कहरच केला. त्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. ऐन काढणी, कापणीच्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतांमध्ये पाणी साचून पिके वाया गेली, तर काही ठिकाणी सोयाबीन, भुईमूग, मका या पिकांना कोंब फुटले. खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीन पिकाची सर्वत्र नासाडी झाली. शेतातून गुडघाभर पाणी साचल्याने पिके सडून दुर्गंधी पसरली. त्यामुळे उत्पादन खर्च अक्षरश: पाण्यात गेला. मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पाण्यात सडल्यामुळे पशुधनासाठी लागणाºया चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, मोहगाव, बाभळेश्वर, कळमकरवाडी, हिंगणवेढे, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, नांदूर, मानूर, दसक, पंचक, गंगावाडी या परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहायक, सरपंच, उपसरपंच यांनी केले असले तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न पडला आहे.
लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे घडकूज, मण्यांना तडा जाणे यांबरोबरच डावणी व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने वारंवार महागडी फवारणी करावी लागते. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. कोवळे घड कुजल्यामुळे अनेक ठिकाणी छाटणी करून अनावश्यक भाग काढून टाकण्यात येत आहे.
द्राक्ष पीक चार ते पाच महिन्यांचे असते. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये द्राक्ष छाटणीला येतात. पावसामुळे फुलोरा, मणी धरणे ते छाटणीपर्यंत प्रत्येक टप्प्यात द्राक्ष बागांना नुकसानीचा सामना करावा लागतो, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगतात.
द्राक्ष उत्पादकांनी ढगाळ वातावरणात द्राक्षबागांची विशेष काळजी घ्यावी. फुलोरा व त्यापुढे आलेल्या द्राक्षबागांमध्ये ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाºया दव, धुक्यामुळे भुरी वाढण्याची शक्यता असते. व्यवस्थित नियोजन करून आत्ताच भुरीचे नियंत्रण केल्यास पुढे जास्त फवारणीची गरज पडणार नाही. सध्या पाऊस थांबलेला असल्याने जमिनीमध्ये वापसा तयार होऊन मुळ्या चांगल्या वाढू शकतात. भुरी, डाउनी, थ्रिप्स, फळकुज यांसारख्या रोगांसाठी बुरशीनाशके, कीटकनाशके फवारणी वेळेवर करावी. आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा फवारणीसाठी वापर झाल्यास भुरीचे चांगले नियंत्रण होईल. त्यामुळे घड जिरणे, कुजणे या समस्याही सुटतील. शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने द्राक्षबागांची निगा राखल्यास फायदा होईल.
- रणजित आंधळे, सहायक कृषी अधिकारी, जाखोरी विभाग
जाखोरी परिसरातील व सजातील जवळपास सर्वच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वास कळमकर, सरपंच सुनीता कळमकर, उपसरपंच अशोक धात्रक यांच्या सहकार्याने झाले आहेत. तसा अहवाल पाठविण्यात आला आहे. द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी कृषी खात्याच्या अधिकाºयांकडून मार्गदर्शन घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
- उत्कर्ष पाटील, ग्रामसेवक, जाखोरी

Web Title:  Delay in crop damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.