मालेगाव येथे कोरोना चाचणी अहवाल मिळण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:40+5:302021-03-24T04:13:40+5:30

------------------- सध्या कोरोना स्वॅब चाचणी करण्यासाठी नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जादा संख्येने नमुने नाशिक येथे पाठवले जात आहे. ...

Delay in getting corona test report at Malegaon | मालेगाव येथे कोरोना चाचणी अहवाल मिळण्यास विलंब

मालेगाव येथे कोरोना चाचणी अहवाल मिळण्यास विलंब

Next

-------------------

सध्या कोरोना स्वॅब चाचणी करण्यासाठी नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जादा संख्येने नमुने नाशिक येथे पाठवले जात आहे. पूर्वी अहवाल धुळे, औरंगाबाद येथील प्राप्त होत होता. आता सध्या नाशिक येथून चाचणी अहवाल येत आहे. दररोज दोनशेहून अधिक नमुने तपासणीसाठी जात असल्याने चाचणी यंत्रणेवर ताण पडतो, असे अधिकारी सांगतात. मालेगावसह इतर अहवाल येथूनच पाठवण्यात येतात. त्यामुळे पूर्वी दोन दिवसात मिळणारा चाचणी अहवाल आता तीन ते चार दिवसात मिळत आहे त्यामुळे चाचणी अहवाल येईपर्यंतची प्रतीक्षा त्रासदायक ठरत आहे . नंतर अहवाल पाॅझिटिव्ह आलाच तर त्या व्यक्तीची मानसिक हतबलता वाढते त्यामुळे कोरोना चाचणी अहवाल लवकरात लवकर मिळेल यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे.

Web Title: Delay in getting corona test report at Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.