वसाकाकडून शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळण्यास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:16 PM2018-03-29T13:16:21+5:302018-03-29T13:16:21+5:30
पिळकोस-वसाका कारखान्याकडून शेतकºयांच्या तोडणी झालेल्या उसाचे बिल तीन महिने होऊनही मिळाले नसल्याने पिळकोस , भादवणसह परिसरातील शेतक-यांकडून वसाका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे .
पिळकोस-वसाका कारखान्याकडून शेतकºयांच्या तोडणी झालेल्या उसाचे बिल तीन महिने होऊनही मिळाले नसल्याने पिळकोस , भादवणसह परिसरातील शेतकºयांकडून वसाका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे . वसाका वाचण्यासाठी शेतकºयांनी वासाकाला उस दिला यात चुकले तरी काय असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे. एकीकडे शेतकºयांच्या उसतोडनीला प्रचंड विलंब करण्यात आला व उस तोडणी झाल्यानंतर तीन महिने होत आले असूनही उसाचे बिल शेतकºयांना मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी बांधव हा संभ्रमावस्थेत सापडला आहे. वसाका सुरू करण्याच्या वेळेस लोकप्रतिनिधिनी गावागावात जाऊन उस उत्पादक शेतकºयांना वसाकाला उस देण्याचा आग्रह धरला .परंतु उस तोडणीसाठी मजुरांची पुरेशी उपलब्धता कारखाना प्रशासनाने त्यावेळी केलेली नव्हती, परिणामी शेतकरी बांधवांचा उस तोडणीस विलंब झाला व उस तोडणी झाली तर शेतकºयांच्या उसाचे बिल वेळेवर देण्याची कारखान्याने तरतूद करणे गरजेचे होते परंतु तसे न करता शेतकºयांना तीन महिन्यापासून वेठीस धरले आहे . शेतकºयांच्या उसाचे पूर्ण बिल अदा करावे अशी मागणी कळवण बाजार समितीचे संचालक मोहन जाधव ,राकेश वाघ , सचिन वाघ , नंदू जाधव ,त्रंबक जाधव , दौलत जाधव , केवळ वाघ ,कौतिक मोरे , राहुल सूर्यवंशी यांसह उस उत्पादक शेतकºयांनी केली आहे.
------------------
उस तोडणी होऊन तीन महिने होत आले,उस बिल मिळाले नाही. शेतकरी हा एवढा मोठा भांडवलदार नाही की तो तीन महिने आपला शेतीमाल देऊन थांबू शकतो .यामुळे शेतकरी पुढील वर्षी वासाकाला उस देताना जरूर विचार करतील.
-रवींद्र अभिमन वाघ ,उस उत्पादक शेतकरी ,पिळकोस
----------------
एकीकडे शेतकरी अगोदरच अडचणीत असून आज रोजी पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे . आपला वसाका पुन्हा उर्जित अवस्थेत यावा यासाठी आम्ही वसाकाला उस दिला, परंतु उस बिल मिळत नसेल तर शेतकºयांनी कोणाकडे न्याय मागवा ? आपला शेतमाल विकून पैसे वेळेवर मिळत नसतील तर हा उस उत्पादक शेतकर्यांवर अन्याय आहे .
-मोहन त्र्यंबक जाधव , उस उत्पादक शेतकरी ,भादवण