शुभारंभालाच विलंब : विभागीय आयुक्तांना लहरी विमानसेवेचा फटका चार तासांच्या प्रतीक्षेनंतर लॅँॅडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:49 AM2018-03-09T00:49:40+5:302018-03-09T00:49:40+5:30
नाशिक : नाशिकहून विमानसेवेसाठी प्रवाशांच्या प्रतिसादावरच या हवाईसेवेचे भवितव्य टिकून असल्याचा आजवरचा अनुभव अधिक दृढ करणारी घटना अलीकडेच घडली आहे.
नाशिक : नाशिकचा केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेत समावेश झाल्याने सुरू होणाºया विमानसेवेबाबत अनेक अपेक्षा उंचावणाºया घोषणा केल्या गेल्या असल्या तरी, प्रत्यक्षात नाशिकहून विमानसेवेसाठी प्रवाशांच्या प्रतिसादावरच या हवाईसेवेचे भवितव्य टिकून असल्याचा आजवरचा अनुभव अधिक दृढ करणारी घटना अलीकडेच घडली आहे. नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने सरकारच्या आदेशाने तत्काळ नवीन पदभार स्वीकारण्यासाठी पुण्याहून निघालेले राजाराम माने यांना त्यांच्या पुणे ते नाशिक या पहिल्याच विमान प्रवासाचा चांगलाच फटका बसला आहे. तब्बल सहा तासांनंतर त्यांचे नाशिकला झालेले आगमन पाहता, त्यापेक्षा रस्ता मार्गाने अधिक लवकर पोहोचले असते, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे. राज्य सरकारने दि. २८ फेब्रुवारी रोजी भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढून तत्काळ अधिकाºयांना बदली व बढतीच्या जागी रुजू होण्याचे आदेश दिले. त्यानुसार नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची मुंबईत मंत्रालयात, तर पुण्यात मेडाचे संचालक राजाराम माने यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. माने यांनी बदलीच्या दिवशीच सायंकाळी नाशिक गाठून झगडे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारण्याचा निर्णय घेतला व त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली. पुण्याहून नाशिकला येण्यासाठी साधारणत: चार ते साडेचार तासांचा प्रवास असल्याने इतका वेळ प्रवासात घालविण्याऐवजी सायंकाळी पुण्याहून टेकआॅफ होणाºया नाशिकच्या विमानसेवेला त्यांनी प्राधान्य दिले व विमानतळावर ते दोन तास अगोदरच पोहोचले. उड्डाण योजनेत सुरू करण्यात आलेली मुंबई-नाशिक-पुणे हवाई सेवेची वेळ पाहता, मुंबईहून सायंकाळी नाशिकसाठी सुटणाºया विमानाने उशिरा टेकआॅप केल्याने ते तब्बल तासभर उशिराने नाशिकला पोहोचले. तत्पूर्वी नवीन विभागीय आयुक्त येणार म्हटल्यावर नाशिकच्या महसूल खात्याच्या अधिकाºयांनी सायंकाळी ६ वाजेपासूनच त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करतानाच त्यात कोणतीही कमतरता तसेच राजशिष्टाचाराचा भंग होणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे ओझर विमानतळावर सायंकाळपासूनच उपविभागीय अधिकारी तैनात करण्यात आला, तर शासकीय विश्रामगृहावरदेखील तलाठ्यांपासून ते जिल्हाधिकाºयांपर्यंत साºयांनीच हजेरी लावली. प्रत्यक्षात मुंबईहून येणारे विमान रात्री ९ वाजता नाशिकला दाखल झाले, साधारण: २५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर ते पुण्याकडे झेपावले, पुण्याला पोहोचल्यानंतर विमानाचा उलट दिशेने प्रवास सुरू झाला व नाशिकला पोहोचेपर्यंत रात्रीचे १२ वाजले. विभागीय आयुक्तांच्या स्वागतासाठी मध्यरात्रीपर्यंत ताटकळलेल्या महसूल अधिकाºयांच्या डोळ्यात झोप मावेनाशी झालेली असतानाही त्यांच्याकडे पर्याय शिल्लक नव्हता, विमानाच्या उशिराच्या आगमनाने शासनाच्या आदेशान्वये त्याच दिवशी विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारण्याचा माने यांचा मनसुबाही लहरी हवाई सेवेने उधळला गेला.