देवगाव परिसरात पावसाअभावी भात लावणीच्या कामांना खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 09:03 PM2020-07-20T21:03:46+5:302020-07-21T01:54:59+5:30

देवगाव : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली असून पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून देवगाव परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला असून भात लावणी करण्यासाठी आवणांत चिखल नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

Delay in paddy planting due to lack of rain in Devgaon area | देवगाव परिसरात पावसाअभावी भात लावणीच्या कामांना खोळंबा

देवगाव परिसरात पावसाअभावी भात लावणीच्या कामांना खोळंबा

Next

देवगाव : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली असून पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून देवगाव परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला असून भात लावणी करण्यासाठी आवणांत चिखल नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. जुलै महिन्याच्या उत्तर्धात भात लावणी पूर्ण करण्याचा कल शेतकऱ्यांचा असतो. त्यानुसार याहीवर्षी शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीला लावणी संपेल अशी तयारी केली होती. परंतू,पाऊस योग्यवेळी न पडल्याने नाईलाजाने शेतीची कामे थांबवावी लागली आहेत. पंधरा दिवसांपासून पावसाने माघार घेतल्यामुळे देवगाव परिसरातील भात, वरई नागलीची रोपे उन्हामूळे करपू लागली आहेत.
विहिर, शेततळ्याच्या पाण्यावर केली भाताची लागवडदेवगावसह वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेंट, श्रीघाट,चंद्राचीमेंट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्षे या भागात तुरळक पाऊस पडत असला तरी उन्हाच्या तडाख्यामुळे तो भातशेतीसाठी किंवा नागली वरईसाठी फायदेशीर नाही. त्यामुळे काही शेतकºयांनी विहीर, शेततळ्याच्या पाण्यावर भाताची लागवड केली़४पाऊस पडत नसल्याने देवगाव परिसरातील शेतकरी आजही भात, नागली,वरईला पूरक असलेल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा असताना आतापर्यंत ५०० मिमीसुद्धा पाऊस पडला नाही. पुनर्वसू नक्षत्र संपले तरी या नक्षत्रात हवा असलेला पाऊस पडला नाही.
दरवर्षी आषाढी एकादशीला लावणीची कामे जवळपास संपलेली असतात. परंतू,यावर्षी पावसाने दगा दिल्याने आवणांमध्ये चिखल नसल्याने लावणी रखडली आहे. आता जोरदार पाऊसाची आवश्यकता आहे.

-------------------------------
- लक्ष्मण देहाडे, शेतकरी (बरड्याचीवाडी) टाकेहर्षे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात,नागली व वरईचे पीक घेतले जाते. शेतकºयांनी महागडी बियाणे, खते,मजुरीचा खर्च, लागवडीचा खर्च करून या पिकांची लागवड केली आहे. भात,नागलींच्या रोपांची बर्यापैकी वाढ झाल्याने त्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. मात्र, पाऊस नसल्याने भात रोपांना खतेसुद्धा देत येत नसल्यामुळे देवगाव परिसरात शेतकºयांना खिरप हंगाम वाया जाण्याची भीती वाटत आहे.

Web Title: Delay in paddy planting due to lack of rain in Devgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक