थंडी आणि धुक्यामुळे रेल्वे वाहतूक विलंबाने
By admin | Published: December 19, 2014 12:39 AM2014-12-19T00:39:58+5:302014-12-19T00:40:10+5:30
थंडी आणि धुक्यामुळे रेल्वे वाहतूक विलंबाने
नाशिकरोड : उत्तर भारतात आलेली थंडीची लाट व धुक्यामुळे रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे.
उत्तर भारतमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे सूर्यनारायणाचे दर्शन उशिराने होत असून, सकाळी उजेडल्यानंतर दाट धुक्यामुळे एक-दोन तास स्पष्ट दिसत नाही. वाढलेली थंडी व धुक्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून, गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वे उशिराने पोहोचत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.
हावडा मुंबई व्हाया अलाहाबाद ही रेल्वे मध्यरात्री आपल्या निर्धारित वेळेत पोहोचण्यापेक्षा पाच तास उशिराने पोहचली. हजरत निजामुद्दीन एलटीटी एक्स्प्रेससुद्धा पाच तास उशिराने वाजता आली. राजेंद्रनगर एलटीटी तीन तास, गोरखपूर-एलटीटी काशी एक्स्प्रेस- दोन तास, फिरोजपूर-मुंबई पंजाब मेल तीन तास उशिराने धावत होत्या. रेल्वे उशिरा धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. (प्रतिनिधी)