पोलिसांच्या वाहने दुरुस्तीला विलंबाचा ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:11+5:302021-03-14T04:14:11+5:30
पोलीस आयुक्तालयांतर्गत नाशिक शहरात १४ पोलीस ठाणे आहे. यामध्ये इंदिरानगर, मुंबई नाका, पंचवटी, अंबड आडगाव, म्हसरूळ, सातपूर, नाशिक रोड, ...
पोलीस आयुक्तालयांतर्गत नाशिक शहरात १४ पोलीस ठाणे आहे. यामध्ये इंदिरानगर, मुंबई नाका, पंचवटी, अंबड आडगाव, म्हसरूळ, सातपूर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, उपनगर, गंगापूर, भद्रकाली आणि सायबर पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांवर वचक रहावे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावे म्हणून ६१ दुचाकी आणि ४७ चारचाकी वाहने गस्त घालत असतात. त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होते. रस्त्यावर धावणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या शासकीय वाहनांच्या दुरुस्तीला मोठा वेळ लागत असल्याने वाहनांमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती नेमकी करायची तरी कोठे? असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहत आहे.
शासकीय दुचाकी व चारचाकी वाहने नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती करण्यासाठी पोलीस परिवहन विभागात आणली जातात. परंतु त्या ठिकाणी वाहने दुरुस्तीसाठी असलेले स्पेअर पार्ट, वाहनांचे टायर आदी साहित्यांची वानवा असल्यामुळे वाहने दुरुस्तीला मोठा वेळ लागतो. वाहनांचे साहित्यच उपलब्ध नसल्याचे कारण या ठिकाणी सांगितले जाते. त्यामुळे सुमारे एक ते दीड महिना संबंधित पोलीस ठाण्याचे चारचाकी किंवा दुचाकी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत पडून राहत असल्याचा अनुभव विविध पोलीस ठाण्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना येत आहे. तसेच काही चारचाकी व दुचाकीचे टायर पूर्णपणे घासले गेले आहे. टायरची नक्षी पूर्णता गायब होऊन मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. यामुळे कधीही टायर फुटून अपघात होऊ शकतो. तसेच वारंवार टायर पंक्चर होण्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागल आहे.
--इन्फो-
सोनसाखळी चोरांना होतोय फायदा
शासकीय चारचाकी, दुचाकींचा वेळोवेळी मेंटेनेंन्स योग्यरित्या होत नसलयाने पोलिसांना दैनंदिन गस्तीच्या कर्तव्य बजावतानाही मर्यादा येत आहेत. गस्त घालण्यास अडचण निर्माण होते त्याचा फायदा शहरात राजरोसपणे फिरणारे तोतया पोलीस व सोनसाखळी चोरटे सर्रास घेताना दिसत आहेत. शहरातील एका पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे वाहन पोलीस परिवहन विभागात दुरुस्तीसाठी वा गेल्या दीड महिन्यापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत धुळखात पडून आहे. पोलीस परिवहन विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील पोलिसांचे शासकीय वाहने ऑक्सिजनवर पोहचलेली आहे