कलम ३७० हटवल्यामुळे अभावितर्फे आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 10:30 PM2019-08-06T22:30:13+5:302019-08-06T22:32:48+5:30

लासलगाव : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काश्मीरच्या संदर्भातील असलेला विशेष कायदा ३७० हटवण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला तो मंजूर करत राष्ट्रपतींनी देखील हिरवा कंदील दिल्याने काश्मीर चा विशेष राज्य असलेला दर्जा रद्द होऊन काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जाणार आहे.

Delegation of absence due to deletion of Article 2 | कलम ३७० हटवल्यामुळे अभावितर्फे आनंदोत्सव

कलम ३७० हटवल्यामुळे अभावितर्फे आनंदोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देभारत माता कि जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या.

लासलगाव : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काश्मीरच्या संदर्भातील असलेला विशेष कायदा ३७० हटवण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला तो मंजूर करत राष्ट्रपतींनी देखील हिरवा कंदील दिल्याने काश्मीर चा विशेष राज्य असलेला दर्जा रद्द होऊन काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जाणार आहे.
याचा जल्लोष करण्यासाठी लासलगाव महाविद्यालयाच्या आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटले, तसेच भारत माता कि जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ११ सप्टेंबर १९९० रोजी चलो काश्मीर आंदोलन चालवले होते. त्यामध्ये परीषदेच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व सतत कलम ३७० व ३५ अ हटविण्यासाठी आंदोलन केले आहे. हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय आहे, असे अभाविपचे शहर मंत्री हर्षद नागरे यांनी या वेळी सांगितले.
या प्रसंगी सुयश कदम, ऋ षिकेश कुमावत, अक्षय कदम, विशाल पालवे, शुभम खांगाळ, रोहित लोखंडे, विकी साळवे, साहिल शेख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Web Title: Delegation of absence due to deletion of Article 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Article 370कलम 370