भामरेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:15 AM2018-12-29T01:15:16+5:302018-12-29T01:16:49+5:30
कांद्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरीवर्गाच्या चिंता वाढल्याने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंसह नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली.
नाशिक : कांद्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरीवर्गाच्या चिंता वाढल्याने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंसह नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. परिणामस्वरुप, केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान ५ टक्क्यावरून १० टक्के केले असल्याचे डॉ. भामरे यांनी म्हटले आहे.
कांद्याच्या बंम्पर उत्पादनामुळे भाव गडगडले आहेत. त्यामुळे, शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलने करत होता. या साºया परिस्थितीमुळे शेतकºयांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना मार्ग काढण्यासंबंधी साकडे घातले होते.
दरम्यान, डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकºयांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार, सुरेश प्रभू यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र पाठवून याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती.
या साºया पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान ५ वरुन १० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, शेतकरीवर्गाला मोठा दिलासा लाभणार असल्याचे डॉ. सुभाष भामरे यांनी म्हटले आहे. शिष्टमंडळात डॉ. गिरासे, खंडू देवरे, प्रशांत देवरे, दीपक चव्हाण, गोकुळ देवरे, प्रवीण सावंत, समीर सावंत, शशीकांत कोर, संभाजी कोर, केदा पवार, निंबा सोळंकी, कृष्णा भामरे, अनिल भामरे, सतीश कापडणीस आदी उपस्थित होते.