विंचूर येथील हटविले अतिक्र मण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 06:51 PM2019-11-28T18:51:51+5:302019-11-28T18:54:04+5:30
विंचूर : येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत उघड्यावर मच्छी व कोंबडीचे मांस विक्र ी करणाऱ्या विक्रेत्यांना पर्यायी जागा देत येथील ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने ग्रास्थांनी समाधान व्यक्त केले आहे. परिणामी येथील गावाच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळील महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे.
विंचूर : येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत उघड्यावर मच्छी व कोंबडीचे मांस विक्र ी करणाऱ्या विक्रेत्यांना पर्यायी जागा देत येथील ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने ग्रास्थांनी समाधान व्यक्त केले आहे. परिणामी येथील गावाच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळील महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे.
विंचूर ग्रामपंचायत हद्दीत तीनपाटीवर गेली सहा सात वर्षापासुन होत असलेली उघड्यावर मास विक्र ी काढावी तसेच जिल्हा परीषद शाळेच्या समोरची फुटपाथवर असलेली दुकाने यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची ग्रामस्थांची तक्र ार आहे. त्यामुळे सदर जागेवरील अतिक्र मण ग्रामपंचायतीने काढावे अशी जेष्ठ नागरीक व ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्र ार करत वेळोवेळी मागणी केले होती.
त्याच अनुषंगाने प्रभारी सरपंच भास्करराव परदेशी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी जी.टी.खैरनार यांनी याबाबत तातडीने अंबलबजावणी करु न रस्त्याच्या कडेची उघड्यावरील मास विक्र ी व मासे विक्र ी करणाºया दुकानदारांना यापूर्वी नोटीसा बजावल्या होत्या. परिणामी येथालु दुकाने हटविण्यात आली आहे.
सदर दुकानदारांना पर्यायी जागा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यानंतर लवकरच जिल्हा परीषद शाळेसमोरील फुटपाथवरील अतिक्र मण काढणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी जी.टी.खैरनार यांनी सांगितले.
अतिक्र मण काढावे म्हणुन ग्रामपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हापरीषद तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे बºयाच तक्र ारी केल्या. आज ग्रामपलिकेने जी कार्यवाही करत अतिक्र मण काढले त्याबद्दल ग्रामपालिकेचा आभारी आहे.
- सहादु बोडके, जेष्ठ नागरीक
अजुनही विंचूर तीनपाटीवरील बºयाच दुकानदारांनी फुटपाथवर अतिक्रमण केलेले आहे. याबाबतच्या तक्र ारी आमच्याकडे आल्या आहे. त्यांनी ते लवकरच काढुन घ्यावे अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
- जी. टी. खैरनार, ग्रामविकास अधिकारी, विंचूर