मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:55+5:302021-04-07T04:14:55+5:30

शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील भिंतीलगत छोट्या खोपटात पंढरीनाथ रंगनाथ कोटमे व कौशाबाई पंढरीनाथ कोटमे हे ...

Delivered by death, persecuted by life ... | मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते...

मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते...

Next

शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील भिंतीलगत छोट्या खोपटात पंढरीनाथ रंगनाथ कोटमे व कौशाबाई पंढरीनाथ कोटमे हे वृध्द निराधार दाम्पत्य राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून सत्यशोधक मंडळाचे कार्यवाह भगवान चित्ते व त्यांचे कुटुंब शक्य तितकी मदत या वृध्दांना करीत होते. जोपर्यंत हातपाय चालत होते तोपर्यंत हे दाम्पत्य भिक्षा मागून आपली गुजराण करीत होते, परंतु अंथरुणाला खिळल्यानंतर त्यांची अवस्था अतिशय बिकट बनली होती.

चित्ते यांनी या दाम्पत्यास भोजन, औषधोपचारासाठी मदत केली. परंतु दोन दिवसाच्या अंतराने या वृध्द दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रथम कौशाबाई व नंतर पंढरीनाथ यांनी जगाचा निरोप घेतला. त्या दोघांना कुणाचाही आधार आणि वारस नसल्याने आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल असा विचार करुन त्या दोघांचेही अंतिम संस्कार सत्यशोधक मंडळाने केले. भगवान चित्ते यांनी मुखाग्नी दिला. यावेळी नितीन संसारे, आनंद चित्ते, गणपतराव शिंदे, संदीप खरात, चंद्रकांत मंडलिक, अरविंद संसारे, रुग्णवाहिका चालक बंडू कवडे आदींनी मदत केली.

फोटो- ०६येवला १- येवला येथे निराधार वृद्धाच्या अंत्यसंस्काराची तयारी करताना भगवान चित्ते, नितीन संसारे, आनंद चित्ते, गणपतराव शिंदे, संदीप खरात, चंद्रकांत मंडलिक आदी.

===Photopath===

060421\06nsk_17_06042021_13.jpg

===Caption===

येवला येथे निराधार वृद्धाच्या अंत्यसंस्काराची तयारी करताना भगवान चित्ते, नितीन संसारे, आनंद चित्ते, गणपतराव शिंदे, संदीप खरात, चंद्रकांत मंडलिक आदी.

Web Title: Delivered by death, persecuted by life ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.