पुस्तके घरपोच देण्याचे विचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:26 PM2020-04-23T22:26:41+5:302020-04-24T00:14:42+5:30
नाशिक : कोरोनामुळे झालेल्या अभूतपूर्व लॉकडाउनमुळे सर्वाधिक कोंडी ही वाचनालयांच्या सभासदांची आणि वाचकांची झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील सावानासह काही वाचनालय पुस्तके घरपोच पोचवून वाचकांना घरीच थांबण्यात योगदान देऊ इच्छित आहेत.
नाशिक : कोरोनामुळे झालेल्या अभूतपूर्व लॉकडाउनमुळे सर्वाधिक कोंडी ही वाचनालयांच्या सभासदांची आणि वाचकांची झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील सावानासह काही वाचनालय पुस्तके घरपोच पोचवून वाचकांना घरीच थांबण्यात योगदान देऊ इच्छित आहेत. मात्र, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी
मिळणे बाकी असून, परवानगी मिळाल्यास या आठवड्यात वाचकांना घरपोच पुस्तके मिळू शकणार आहेत.
महानगरातील हजारो पुस्तकप्रेमींसाठी पुस्तके ही श्वास असतात. मात्र, संचारबंदीमुळे नियमित वाचकांना वाचनालयापर्यंत जाणेही शक्य नाही. संचारबंदी लागू होण्यापूर्वी वाचकांनी आणलेली पुस्तकेच त्यांच्याकडे उरली आहेत. त्यामुळे वाचकांची अक्षरश कुचंबना होत आहे. वाचनासाठी घरोघरी येणारी नियमित वृत्तपत्रही नसल्याने वाचकांना अस्वस्थता वाटू लागली आहे.
----------
संचारबंदीमुळे वाचक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत पूर्वीप्रमाणेच घरोघरी पुस्तक योजनेला पुन्हा सुरुवात करण्याचा आमचा विचार आहे. वाचकांचे मनोरंजन होण्यासह ते पुढील काळ घरात आनंदाने थांबू शकतील.
-सुभाष तिडके, मखमलाबाद वाचनालय
---------------------
वाचनालयापर्यंत वाचक येऊ शकत नसतील, तर निदान पुस्तकांच्या वाहनांना वाचकांच्या दारापर्यंत मुभा मिळावी, यासाठी संपर्क साधण्यात येणार आहे. त्यामुळे वाचकांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळू शकेल.
- जयप्रकाश जातेगावकर, सावाना
------------------
पंचवटी वाचनालयाच्या हजारो सभासदांची मोठी कोंडी झाली आहे. मात्र संचारबंदीमुळे त्याबाबत पर्याय उरलेला नाही. पण जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यास सभासदांना घरोघर पुस्तक योजनेबाबत विचार करता येईल.
नथूजी देवरे, पंचवटी सार्वजनिक वाचनालय