उज्ज्वला योजनेअंतर्गत मुल्हेरला गॅसचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:48 AM2018-10-21T00:48:36+5:302018-10-21T00:48:58+5:30
मुल्हेर (ता. बागलाण) येथे अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेच्या माध्यमातून उज्ज्वला योजनेअंतर्गत गावातील आदिवासी बांधवांना गॅस संचाचे वितरण करण्यात आले.
ताहाराबाद : मुल्हेर (ता. बागलाण) येथे अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेच्या माध्यमातून उज्ज्वला योजनेअंतर्गत गावातील आदिवासी बांधवांना गॅस संचाचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच मोठाभाऊ जगताप हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे उपसभापती किशोर भापकर, ग्रामपंचायत सदस्या सोनाली भापकर, अनुलोमचे बागलाण तालुकाप्रमुख संजय गोसावी, अनुलोमच्या संचालक माया येवला, विकास बत्तीसे उपस्थित होते. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वंचित घटकांच्या विकासासाठी व शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अनुलोम ही संस्था कार्य करीत असून, उज्ज्वला योजनेची माहिती व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यासंदर्भात माया येवला यांनी माहिती दिली. विकास बत्तीसे यांनी मनोगत व्यक्त केले. गावातील आदिवासी बांधवांना गॅस सिलिंडर, शेगडी व किटचे वाटप करण्यात आले.
फोटो कॅप्शन -
(फोटो २० येवला)