रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 02:08 PM2018-11-27T14:08:01+5:302018-11-27T14:10:55+5:30
लासलगाव : येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्र मांक दोनवर मंगळवारी सकाळी ११.३० वाजता एका महिलेची प्रसूती झाली.तिनं एका मुलाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण दोघंही सुखरु प आहेत.
लासलगाव : येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्र मांक दोनवर मंगळवारी सकाळी ११.३० वाजता एका महिलेची प्रसूती झाली.तिनं एका मुलाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण दोघंही सुखरु प आहेत. प्रसूती झालेली महिला सुनीता विशाल गायकवाड व तिच्या सोबत असलेली महिला मीरा अनिल पाथरे (देवगाव) या दोघी लासलगाव रेल्वे स्थानकावरून मोहनबारे (ता.चाळीसगाव) येथे जाण्यासाठी काशी एक्सप्रेसने निघाल्या होत्या. गायकवाड यांना लासलगाव रेल्वे स्थानकातच प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिची मावशी रडत असतांना नितीन शर्मा यांच्या लक्षात आले त्यांनी १०८ ला फोन करून बाजूने शाल व साडी बोलावू न स्टेशनमध्ये स्टेचर बोलवून त्या बाईला रूग्णवाहिकेमध्ये दखल केले. तिला मुलगा झाला. आई व बाळ सुखरूप आहेत. डॉ.विजय केंगे यांनी मदत केली.तसेच स्थानकातील इतर महिला प्रवासी तिच्या मदतीसाठी धावून गेल्या. गायकवाड या मालेगाव जवळ टेहरे गावच्या आहेत. पुढील उपचारासाठी या महिलेस व बाळास लासलगावच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी रेल्वे स्टेशन मास्टर समाधान सुरवाडे व रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष मदत केली.