जिल्ह्यातील रोहित्रांसाठी ५५ कोटींची शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:55 PM2020-02-08T23:55:28+5:302020-02-09T00:23:56+5:30

नाशिक जिल्ह्यातील रोहित्रांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त ५५ कोटी रुपयांची मागणी आपण शासनाकडे केली असून, लवकरच निधी प्राप्त होऊन जिल्ह्यातील विजेचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

Demand for 5 crores of government for Rohrits in the district | जिल्ह्यातील रोहित्रांसाठी ५५ कोटींची शासनाकडे मागणी

कानळदे उपकेंद्राचे उद्घाटन करताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, शांताराम जाधव आदी.

Next
ठळक मुद्देछगन भुजबळ । कानळदे वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरू

लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील रोहित्रांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त ५५ कोटी रुपयांची मागणी आपण शासनाकडे केली असून, लवकरच निधी प्राप्त होऊन जिल्ह्यातील विजेचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
निफाड तालुक्यातील कानळदे येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, देवगाव सबस्टेशनमधून शिरवाडे, वाकद, कानळद, कोळगाव या गावांना वीजपुरवठा होत होता. मात्र वीजपुरवठा सुरळीत नसल्याने मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी उपकेंद्र निर्मितीसाठी मागणी होती. प्राधान्याने हे काम हाती घेण्यात आले. आता या उपकेंद्रामुळे वाकद, शिरवाडे, कोळगाव, कानळदे आदी गावांतील शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा होणार आहे.
तसेच शिरवाडे, वाकद, कोळगाव, कानळदे हे तीनही फिडर स्वतंत्र करण्यात आले आहे. राज्यमार्ग सातवरील कानळदे, खेडले हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आला असून, बजेटमध्ये तरतूद करून या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावले जातील, असेही भुजबळ म्हणाले. राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतून नाशिक जिल्ह्यात दीड लाख शेतकºयांना दीड हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्याचबरोबर दोन लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकºयांसाठी तसेच नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांसाठी लवकरच नवीन योजना तयार करून मदत देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता बिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, संजय खंडारे, रवींद्र आव्हाड, नीलेश चालीकवार, प्रांत डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, सरपंच शांताराम जाधव, विनोद जोशी आदी उपस्थित होते.

४.३५ कोटींचा खर्च
सबस्टेशनच्या कामासाठी ४ कोटी ३५ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, या केंद्राच्या निर्मितीबरोबरच देवगाव येथे पाच एमव्हीएचे रूपांतर १० एमव्हीएमध्ये, तर ३३ केव्हीची ९ किमीची, तर ११ केव्हीची किमीच्या नवीन वाहिनी जोडण्यात आली.

Web Title: Demand for 5 crores of government for Rohrits in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.