मीटररीडिंगप्रमाणेच अचूक वीजदेयके देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 07:04 PM2020-06-24T19:04:33+5:302020-06-24T19:16:57+5:30
सिडको : महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सदोष तसेच वाढीव रकमेची देयके (बिल) आकारल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अचूक आकारणी करून मीटररीडिंगप्रमाणेच वीजदेयके देण्यात यावी. तसेच वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांनी विद्युत अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिडको : महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सदोष तसेच वाढीव रकमेची देयके (बिल) आकारल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अचूक आकारणी करून मीटररीडिंगप्रमाणेच वीजदेयके देण्यात यावी. तसेच वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांनी विद्युत अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना विषाणूच्या संकटामुळे नोकरी, व्यवसाय अडचणीत आले असताना महावितरण कंपनीने तीन महिन्यांच्या लॉकडाऊनदरम्यान अव्वाच्या सव्वा रकमेची बिले पाठविल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे वीज नियामक आयोगाच्या दि. ३० मार्च २०२० च्या आदेशान्वये वीजदरात मोठी वाढ करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ ग्राहकांच्या लक्षातच आली नाही. दुसरी बाब लॉकडाऊनच्या काळात मीटररीडिंग घेण्यात आले नाही. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने मीटररीडिंग घेण्यात आले. तेव्हा तीन महिन्यांच्या कालावधीचा वापर एकत्र नोंदला गेला. महापालिका क्षेत्रातील वीजग्राहकांना बिलांमध्ये प्रत्येकी दहा रु पये कोविड-१९ अधिभार लावण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांचे रोजगार बंद आहेत, तर काहींचे बुडाले आहेत. अशा परिस्थितीत दैनंदिन गरजा भागविताना नागरिकांची दमछाक होत आहे. त्यातच महावितरणकडून वाढीव वीजदेयके आकारल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम असून, याबाबतीत महावितरणकडून सदोष वीजबिल आकारणीमुळे प्रशासनाविरोधात असंतोष पसरला आहे. महावितरणकडून ग्राहकांना अचूक वीजदेयके मीटररीडिंगनुसारच आकारण्यात यावी, महावितरणकडून सदोष आकारलेली बिले कमी करण्यात यावी, त्याचप्रमाणे वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागे घेण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरु पाचे आंदोलन केले जाईल, अशा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. आमदार सीमा हिरे यांनी महावितरण अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले. यावेळी नगरसेवक छाया देवांग, मनीषा देवरे, मंडल अध्यक्ष शिवाजी बरके, अविनाश पाटील, अमोल इघे, राजेंद्र चिखले, राकेश ढोमसे, प्रकाश चकोर, हेमंत नेहते, परमानंद पाटील, तेजस निरभवणे, सुशील नाईक आदि उपस्थित होते.