बच्छाव, चिकणकर यांच्यावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:29+5:302021-06-19T04:10:29+5:30
------------------------------- गळफास घेऊन युवकाची आत्महत्या सिन्नर : शहरातील गोजरे मळा परिसरात १८ वर्षीय युवकाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या ...
-------------------------------
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
सिन्नर : शहरातील गोजरे मळा परिसरात १८ वर्षीय युवकाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. राहुल अशोक साळुंखे असे मृत युवकाचे नाव आहे. राहुल साळुंखे याने भगवान बाबूराव गोजरे यांच्या पडीत घरात आढ्याला सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर अजिंक्य गोरख वराडे यांनी सिन्नर पोलिसांत दिल्यावरून सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
----------------------------------
सिन्नरला ५३ वटवृक्षांचे वाटप
सिन्नर : सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त ५३ वटवृक्षाच्या रोपांचे वाटप तसेच कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुटे आदींचा तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.
-------------------------------
शनिवार, रविवारी आस्थापना बंद
सिन्नर : शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता आणलेली आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. नागरिकांनी घराबाहेर पडून बाजारपेठेत गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार कोताडे यांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.