मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी
By admin | Published: December 8, 2015 11:46 PM2015-12-08T23:46:19+5:302015-12-08T23:47:07+5:30
मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी
येवला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन साजरा न करता सुट्टी घेतली, शिवाय २६ नोव्हेंबर हा संविधान दिनाचा कार्यक्रम बल्हेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत साजरा केला नाही. या प्रकरणी चौकशी करून मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन येथील ग्रामस्थांनी येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले आहे. ग्रामस्थांचे निवेदन सहायक गटविकास अधिकारी सोनकुसळे यांनी स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, संविधान दिवस उत्साहात साजरा होत असताना बल्हेगाव शाळा याला अपवाद ठरली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा न करता मुख्याध्यापकांनी सुटी उपभोगली. या प्रकरणी सखोल चौकशी करून मुख्याध्यापक बागुल यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन तसेच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर जितेश पगारे, रणजित संसारे, हर्षदा पगारे, शालेय समिती सदस्य बाळासाहेब वाल्हेकर, दत्तात्रय जमधडे, नितीन संसारे, ज्ञानेश्वर जमधडे, सुधाकर वाल्हेकर, गंगाधर वाल्हेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.