अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:10 AM2018-06-17T00:10:33+5:302018-06-17T00:10:33+5:30
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे वाकडी येथील अल्पवयीन मुलांना विहिरीत पोहण्याच्या कारणावरून व जातीय मानसिकतेतून कुरापत काढून बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात येऊन अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.
पंचवटी : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे वाकडी येथील अल्पवयीन मुलांना विहिरीत पोहण्याच्या कारणावरून व जातीय मानसिकतेतून कुरापत काढून बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात येऊन अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. अतिशय किरकोळ कारणावरून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच सदर अल्पवयीन मुलांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, रामेश्वर साबळे, चंद्रकांत कासार, अभिजित पगारे, जयेंद्र सोनवणे, रोहित खरात, विनोद बांगर, मारुती वाणी आदींसह समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.