हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:32 AM2018-11-05T00:32:14+5:302018-11-05T00:32:30+5:30
नागपूर जिल्ह्यातील नरखेडा तालुक्यातील आरंभी गावचे सरपंच नरेश गिते यांनी गावात दारूबंदीचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नाशिकरोड : नागपूर जिल्ह्यातील नरखेडा तालुक्यातील आरंभी गावचे सरपंच नरेश गिते यांनी गावात दारूबंदीचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना नाशिक जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सरपंच बाळासाहेब म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका दारू विक्रेत्यांने सरपंच नरेश गिते यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. गिते यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाºया संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, प्रसाद पाटील, भाऊसाहेब कळसकर, नाना घुगे, शरद म्हस्के, भाऊसाहेब म्हस्के, ज्ञानेश्वर म्हस्के, बाळासाहेब घुगे, चंद्रभान म्हस्के, आदींच्या सह्या आहेत.