संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 09:31 PM2018-08-14T21:31:53+5:302018-08-14T21:33:19+5:30
संविधानाची विटंबना करणाºया संशयितांविरुद्ध कडक व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मालेगाव येथील रिपाइं, भारिप बहुजन महासंघ, भारतीय बहुजन महासंघ, आदिवासी एकता परिषद, भारतीय वाल्मिक समाज आदि संघटनांच्या वतीने प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भारतीय संविधाची विटंबना करणाºया संशयित आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. संबंधितांना कडक शासन करावे, अशी मागणी रिपाइंचे नितीन झाल्टे, दिलीप अहिरे, भारत चव्हाण, रमेश निकम, आनंद वाघ, भगवान आढाव, सुनील अहिरे, दादाजी महाले, शांताराम लाठर, आनंद वाघ, भारिप बहुजन महासंघाचे कपिल अहिरे, सुनील अहिरे, दिलीप शेजवळ, शांताराम सोनवणे, योगेश निकम, भारिप बहुजन महासंघाचे बिपीन पटाईत, भारत म्हसदे, किरण खरे, रूपेश पटाईत, विशाल खरे, आदिवासी एकता परिषदेचे राजेंद्र माळी, कैलास पवार, मंगला तलवारे, रमेश माळी, राकेश माळी, धोंडू पवार, मालजी मोरे, भारतीय बाल्मिकी समाजाचे भारत बेद, दिलीप जेधे, मुकेश कबीरे, कालिचरण बेद, सुनील मंडोठिया, सुरेश घुसर आदिंसह पदाधिकाºयांनी केली आहे.