बोगस अपंग शिक्षकांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:59 AM2017-08-27T00:59:05+5:302017-08-27T00:59:05+5:30

बदल्यांमध्ये सूट मिळविण्यासाठी बोगस अपंग प्रमाणपत्र मिळविणाºया शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मालेगाव महानगर जिल्हा सरचिटणीस उमाकांत कदम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 Demand for action on bogus disabled teachers | बोगस अपंग शिक्षकांवर कारवाईची मागणी

बोगस अपंग शिक्षकांवर कारवाईची मागणी

googlenewsNext

मालेगाव : बदल्यांमध्ये सूट मिळविण्यासाठी बोगस अपंग प्रमाणपत्र मिळविणाºया शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मालेगाव महानगर जिल्हा सरचिटणीस उमाकांत कदम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून जिल्ह्यातील काही शिक्षकांनी सोयीची ठिकाणे मिळविली आहेत. ज्या समितीने अपंग असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे, त्या समितीचा कार्यक्षेत्रात कुठलाही संबंध दिसून येत नाही. जिल्ह्यातील वास्तव्याचे खोटे पुरावे देऊन प्रमाणपत्र मिळविले आहे. बदलीमधून सूट मिळविण्यासाठी अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर, दुर्धर आजार, पक्षघात, घटस्फोटित, परितक्त्या अशी खोटी प्रमाणपत्रे काही शिक्षकांनी मिळविली आहेत. यामुळे खºया अपंग व सर्वसामान्य शिक्षकांवर अन्याय होत आहे. बोगस अपंग शिक्षकांच्या अपंग प्रमाणपत्राची पडताळणी करावी. या पडताळणीत दोषी आढळणाºया शिक्षकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी निवेदनात केली आहे.

Web Title:  Demand for action on bogus disabled teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.