शेतकरी मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 05:35 PM2020-10-26T17:35:02+5:302020-10-26T17:35:44+5:30

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारसमिती म्हणून नाव लौकीक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. २३) टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांस येथील आडतदाराकडून मारहाण झाली त्या अडती वर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बाजारे यांना निवेदन देऊन केली आहे .

Demand for action in farmer beating case | शेतकरी मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी

शेतकरी मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांसह, सामाजिक कार्यकर्त्यांचे बाजार समितीला निवेदन

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारसमिती म्हणून नाव लौकीक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. २३) टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांस येथील आडतदाराकडून मारहाण झाली त्या अडती वर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बाजारे यांना निवेदन देऊन केली आहे .
त्यावर दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन सचिव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी कारसूळ येथील शेतकरी जितेंद्र बाळासाहेब जाधव हे गेल्यावर संत सावता माळी आडतमधील दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून सोमवारी (दि.२६) उंबरखेडचे माजी सरपंच भाऊ घुमरे, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे, प्रकाश वाटपाडे, बेहेडचे माजी सरपंच अशोक घुटे, दावचवाडीचे माजी सरपंच योगेश कुयटे, पीडित शेतकरी जितेंद्र जाधव आदीसह शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिव बाळासाहेब बाजारे यांना निवेदन दिले.
या मारहाण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी (दि. २७) सभापती दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे बाजारे यांनी सांगितले.
दरम्यान, बाजार समिती परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे अशोक घुटे यांनी लक्ष वेधले. त्यावर असे प्रकार आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे बाजारे यांनी सांगितले.

शेतकरी दारू पिला नसल्याचा खुलासा
मारहाण झालेल्या शेतकर्याने मद्यपान केले असल्याचा आरोप आडत मालकाने केला होता. मात्र, संबंधित शेतकऱ्याने मद्यपान केले नसल्याचा खुलासा बाजार समिती कर्मचारी दीपक गवळी यांनी केला.

कारवाई होणारच...!
कारसूळ येथील शेतकरी जितेंद्र बाळासाहेब जाधव यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधितांवरकारवाई होणार असल्याचे बाजार समिती सचिव बाळासाहेब बाजारे यांनी सांगितले.

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर बाजार समितीने कारवाई करावी. तसे न झाल्यास आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.
- प्रकाश वाटपाडे, सामाजिक कार्यकर्ते, पाचोरे वणी

शुक्रवारी टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी गेल्यानंतर मला आडतदारांकडून मारहाण करण्यात आली. मात्र, तीन दिवस उलटूनही अद्याप त्या आडतदाराने पैसे दिलेले नाहीत. उलट माझी बदनामी करण्याचे षडयंत्र त्यांनी सुरू केले आहे
- जितेंद्र जाधव, पीडित शेतकरी, कारसूळ.

(फोटो २६ पिंपळगाव १)
मारहाण करणार्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सचिव बाळासाहेब बाजारे यांना देताना भाऊ घुमरे, देवेंद्र काजळे, योगेश कुयटे, अशोक घुटे, प्रकाश वाटपाडे, जितेंद्र जाधव आदी.

 

Web Title: Demand for action in farmer beating case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.