‘त्या’ कवीवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:34 AM2018-09-29T01:34:00+5:302018-09-29T01:35:39+5:30

 The demand for action on 'that poem' | ‘त्या’ कवीवर कारवाईची मागणी

‘त्या’ कवीवर कारवाईची मागणी

Next

पेठ : मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या एका कवितेत आदिवासी महिलांबाबत अश्लील शब्द वापरल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून, संबंधित कवी व मुंबई विद्यापीठ प्रशासनावर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आदिवासी विकास
परिषद व महादेव कोळी महासंघ यांच्या वतीने पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे , कवी दिनकर मनावर यांच्या ‘पाणी कसं असतं’ या कवीतेत पाण्याची तुलना आदिवासी मुलींच्या शरीराशी करण्यात आली असून, त्यात अश्लील शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कवितेचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमातही करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित कवी व मुंबई विद्यापीठ प्रशासनावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर नगराध्यक्ष मनोज घोंगे, विशाल जाधव, छगन चारोस्कर, हरीदास भुसारे, हेमराज धुम, जीवन जाधव, अरूण राऊत, विजय देशमुख हेमंत हलकंदर आदींच्या सह्या आहेत.
विद्यापीठावर धडकणार
या कवितेच्या विरोधात श्रमजीवी संघटनेच्या महिला शाखेतर्फे ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक या चार जिल्ह्यातील तहसील कार्यालयावर शनिवार दि. २९ रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी मुंबई विद्यापीठावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे बाळाराम भोईर व विजय जाधव यांनी सांगितले.
आज इगतपुरीत मोर्चा
‘पाणी कसं असतं’ ही कविता पाठ्यपुस्तकातून वगळण्यासाठी तसेच संबंधित कवी व मुंबई विद्यापीठावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवार, दि. २९ रोजी इगतपुरीत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी कळविले आहे.

Web Title:  The demand for action on 'that poem'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.