त्र्यंबकच्या वारीला पारंपरिक मानकऱ्यांच्या प्रवेशाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 06:51 PM2021-01-31T18:51:58+5:302021-01-31T18:52:47+5:30

कसबे सुकेणे: त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौष वारी व मंदिर दर्शनास जिल्ह्यातील पारंपरिक दिंडी समाज मानकऱ्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे वारकरी, फडकरी, दिंडी महिना समाज या वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माधवदास महाराज राठी, बाळासाहेब महाराज काकड, दत्तात्रय महाराज डुकरे, नितीन सातपुते यांच्या नेतृत्वाखाली केली आहे.

Demand for admission of traditional standard bearers to Trimbak Wari | त्र्यंबकच्या वारीला पारंपरिक मानकऱ्यांच्या प्रवेशाची मागणी

त्र्यंबकच्या वारीला पारंपरिक मानकऱ्यांच्या प्रवेशाची मागणी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील वारकऱ्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

कसबे सुकेणे: त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौष वारी व मंदिर दर्शनास जिल्ह्यातील पारंपरिक दिंडी समाज मानकऱ्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे वारकरी, फडकरी, दिंडी महिना समाज या वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माधवदास महाराज राठी, बाळासाहेब महाराज काकड, दत्तात्रय महाराज डुकरे, नितीन सातपुते यांच्या नेतृत्वाखाली केली आहे. दरम्यान, इतर मानकऱ्यांना प्रवेश व दर्शन न दिल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असेही नितीन सातपुते व शिष्टमंडळाने सांगितले.

त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौष वारीला प्रांताधिकारी यांनी संस्थान पुजारी व विश्वस्तांनी दिलेल्या यादीनुसार केवळ १२ मानकरी एकूण २५० जणांना वारी प्रवेश व दर्शनास परवानगी दिलेली आहे. यात इतर मानकरी, दिंडीवाले व प्रमुख संस्थान यांचा समावेश नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. पन्नास वर्षाहून अधिक काळापासून दिंड्या त्र्येंबकेश्वर पौष वारी परंपरेच्या आहेत, काही दिंड्या तर २०० वर्ष परंपरेच्या असून या दिंड्यांच्या मानकऱ्यांनाही त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश व दर्शनाची परवानगी द्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.
या शिष्टमंडळात माधवदास महाराज राठी, बाळासाहेब महाराज काकड, दत्तात्रय महाराज डुकरे, चंद्रकांत महाराज आहेर, भाऊसाहेब भवर, अखिल भारतीय वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते, सोमनाथ महाराज भुसारे, संदीप मानकर यांचा समावेश होता.

कोरोनामुळे यंदा वारीत मोजक्याच मानकऱ्यांना प्रशासनाच्यावतीने प्रवेश दिला जाणार आहे. जिल्हा व जिल्ह्याबाहेरून सुमारे ५० ते २०० वर्ष परंपरेच्या दिंड्या आहेत. या परंपरेच्या दिंड्यांच्या मानकऱ्यांनाही प्रवेश व दर्शन दिले जावे अन्यथा वारकरी आंदोलन छेडतील.
- नितीन सातपुते, प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी परिषद

Web Title: Demand for admission of traditional standard bearers to Trimbak Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.