जिल्हा रुग्णालयातील सर्व बेड कोरोना रुग्णांना देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:37 PM2021-04-17T17:37:14+5:302021-04-17T17:49:19+5:30
चांदवड : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांना द्याव्यात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नॉनकोविड उपचारांचे काम विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाकडे वर्ग करावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन केली आहे.

सध्या जिल्हाभर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. त्यांच्यासाठी उपचाराच्या सर्व सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांना द्याव्यात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नॉनकोविड उपचारांचे काम विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाकडे वर्ग करावे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना तातडीने तीनशे खाटा उपलब्ध होतील. प्रशासनावरील ताणदेखील काही प्रमाणात हलका होईल, अशी मागणी आहेर यांनी केली आहे. यासंदर्भात डॉ. आहेर यांनी नुकतीच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विभागीय महसूल आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.