ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:03+5:302021-05-09T04:15:03+5:30
तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती व प्रशासकीय उपाययोजना संदर्भात डॉ. भारती पवार यांनी शनिवारी (दि. ८) येथील तहसील कार्यालयात आढावा ...
तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती व प्रशासकीय उपाययोजना संदर्भात डॉ. भारती पवार यांनी शनिवारी (दि. ८) येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यामध्ये कोरोना विषयक चाचणी, लसीकरण, कोविड सेंटर, कोरोनाबाधित रुग्णसंख्या व उपचार, भौतिक व वैद्यकीय सुविधा आदींचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार संदीप भोसले, जि.प. सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, डॉ. प्रशांत भदाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वाघ, शहराध्यक्ष त्र्यंबक कामडी, गणेश गवळी, रमेश गालट यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयास भेट
येथील ग्रामीण रुग्णालयास डॉ. भारती पवार यांनी भेट देऊन सुविधांची पाहणी केली. रुग्णालय परिसरात पसरलेल्या कचऱ्यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला भ्रमणध्वनीवरून सूचना दिल्या. जवळपास दीड लाख लोकसंख्या असलेल्या तालुक्यासाठी केवळ २१ ऑक्सिजन बेडची व्यवस्था असल्याने अत्याधुनिक ऑक्सिजनची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी चर्चा केली. रिक्त पदे भरण्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.