कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:07 PM2020-02-16T18:07:00+5:302020-02-16T18:08:39+5:30
पेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या पेठ तालुक्याला दरवर्षी जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईचे वेध लागत असून सद्याच्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याने आदिवासी भागात अनेक गावांसाठी एकत्रित नळपाणी पुरवठा योजना मंजूर करावीत अशी मागणी पेठ तालुक्यातील जनतेने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ तालुका हा भौगोलिक दृष्टया डोंगरदऱ्यात वसलेला आहे. गावागावात कार्यान्वयीत केलेल्या पाणीपुरवठा योजना ऐन ऊन्हाळ्यात कोरडया पडत असतात. त्यामूळे उंचावरील गावांसाठी शासनाने जलजीवन मिशन योजनेतंर्गत एकत्रित योजना राबवल्यास बहुतांश गावांचा पाणीप्रश्न सुटेल अशी मागणी करण्यात आली आहे.
पेठ शहरासह खोकरतळे, भूवन, धानपाडा, कुंभाळे, कोपूर्ली, खंबाळे, तोंडवळ, घुबडसाका यासारख्या गावांना दरवर्षी टंचाईचा सामना करावा लागतो.
याप्रसंगी आमदार नरहरी झरिवाळ, नगराध्यक्ष मनोज घोंगे, माजी उपसभापती तुळशिराम वाघमारे, सरपंच रामदास वाघेरे, रमेश दरोडे, गणेश शिरसाठ यांचे सह पेठ तालुक्यातील सरपंच व सदस्य उपस्थित होते.