आषाढी एकादशीचा फराळ मागणी वाढल्याने महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 02:46 PM2020-07-01T14:46:53+5:302020-07-01T14:47:17+5:30

त्र्यंबकेश्वर : आषाढी वारीवर जसा कोरोनाच्या प्रभावामुळे परिणाम झाला तसाच तो फराळाच्या पदार्थांवर देखील जाणवत आहे. यंदा सर्वच फराळाचे पदार्थ महाले असुन लॉकडाउनमुळे जनता घरातच बसुन आहे. वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने हातावर कामकरणाऱ्या लोकांना आषाढीचा एक प्रकारे उपवास घडत आहे.

Demand for Ashadi Ekadashi has gone up due to high demand! | आषाढी एकादशीचा फराळ मागणी वाढल्याने महागला !

आषाढी एकादशीचा फराळ मागणी वाढल्याने महागला !

Next

लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : आषाढी वारीवर जसा कोरोनाच्या प्रभावामुळे परिणाम झाला तसाच तो फराळाच्या पदार्थांवर देखील जाणवत आहे. यंदा सर्वच फराळाचे पदार्थ महाले असुन लॉकडाउनमुळे जनता घरातच बसुन आहे. वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने हातावर कामकरणाऱ्या लोकांना आषाढीचा एक प्रकारे उपवास घडत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा उपवास असल्याने उपवासाच्या पदार्थांना विशेष मागणी असल्याने व्यावसायिकांनी संधीचा फायदा घषत सदर व्तूंच्या दरात वाढ केली. आता हाच उपवास उद्या द्वादशीला सोडला जाईल.
सकाळीच संत शिरोमणी तथा वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु निवृत्तीनाथ महाराज यांच्या नित्य नैमित्तीक परंपरे प्रमाणे एकादशीची महापुजा पुजारी तथा विश्वस्त जयंत महाराज गोसावी यांनी केली. यावेळी त्र्यंबकेश्वर मधील शेकडो भाविकांनी श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदीराचे ते बंद असल्याने बाहेरु नच दर्शन घेत होते. दुसरा उपाय नव्हता. गावातील शेवरे गल्लीतील असलेल्या गायधनी यांच्या वेद पाठशाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदीरात दर्शनासाठी भाविक दर्शनासाठी अधुन मधुन येत होते. फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर लोक स्वत:च करीत होते. निवृत्तीनाथ समाधी मंदीरातील विठ्ठल रखुमाई मंदीर समाधी मंदीरच बंद असल्याने तेथेही भाविक बाहेरूनच दर्शन घेत होते.
दरम्यान आषाढीच्या फराळाच्या पदार्थमधील रताळी १२०, साबुदाणा ७०, शेंगदाणे ११०, खजुर १२०, गुळ ५०, बटाटे २५ रुपये किलो दराने विकले जात होते. तर केळीचा भाव ३० ते ४० रुपये डझन होता.
त्र्यंबकेश्वर येथुन गेलेली संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका मंगळवारी (दि.३०) शिवशाही बसने रात्री उशीरा पोहचल्या. पारंपारिकरित्या ज्या मानाच्या विशेष सात पालख्या आहेत. त्यांचे दर्शन देखील क्र मवारी होत असते. त्र्यंबकेश्वर येथुन गेलेल्या निवृत्तीनाथ यांच्या पारखीचा चौथा क्र मांक होता.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथुन गेलेली पालखीचा महाराष्ट्रातील मानाच्या पालखीमध्ये समावेश आहे. याचा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरसह नाशिक जिल्ह्याला भुषणावह आहे.

Web Title: Demand for Ashadi Ekadashi has gone up due to high demand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.