रेशन दुकानदारांवरील हल्ले रोखण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:21 PM2020-04-21T22:21:18+5:302020-04-21T22:21:29+5:30

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने निवेदन

 Demand for attacks on ration shopkeepers | रेशन दुकानदारांवरील हल्ले रोखण्याची मागणी

रेशन दुकानदारांवरील हल्ले रोखण्याची मागणी

Next
ठळक मुद्देअनेक सेवाभावी संस्थांनी रातोरात जन्म घेत समाजसेवेच्या नावाखाली दुकानदारांकडून धान्य व पैशाची सर्रास मागणी

इगतपुरी : तालुक्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानधारकांना होत असलेली मारहाण, शिवीगाळ तसेच अनेकजण खंडणीची मागणी करीत आहेत. त्यामुळे दुकानदार दहशतीखाली असून, सदर हल्ले रोखण्याची मागणी करणारे निवेदन तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अर्चना पागिरे-भाकड यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना जीव धोक्यात घालून सर्व स्वस्त धान्य दुकानदार धान्य वितरित करीत आहेत, मात्र काही राजकीय कार्यकर्ते टवाळखोरांना हाताशी धरून दुकानदारांना नाहक त्रास देत आहेत. दुकानदारांकडून खंडणी मागण्याचे प्रकार वाढत असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अनेक सेवाभावी संस्थांनी रातोरात जन्म घेत समाजसेवेच्या नावाखाली दुकानदारांकडून धान्य व पैशाची सर्रास मागणी केली जात आहे. याप्रसंगी इगतपुरी तालुका सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान व रॉकेलविक्रे ता संघाचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव, मोहन रावत, नियाज खिलफा, प्रीती पिंपळे, रंजना बोराडे, गौतम पंडित, नामदेव साबळे, मुरलीधर डहाळे, संपतराव बांबळे, शिवराम जोशी, भगवान भोईर, अरुण भागडे, सुमनबाई दराडे, संजय गोवर्धने, संतोष साबळे, बाळासाहेब घोरपडे, आदी दुकानदार उपस्थित होते.

Web Title:  Demand for attacks on ration shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक