’त्या’ ग्रामपंचायत कर्मचार्याला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:16 PM2020-09-10T23:16:16+5:302020-09-11T00:50:57+5:30

पिंपळगाव बसवंत : गणेश विसर्जनप्रसंगी पिंपळगाव येथील कादवा नदीत दोन ग्रामपंचायत कर्मचारी पडले असता त्यांना वाचवून स्वत:चा जीव गमावलेल्या रवींद्र मोरे या कर्मचार्याला शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर बनकर यांनी केली आहे. कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांच्याकडे याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

Demand for award of gallantry award to 'that' Gram Panchayat employee | ’त्या’ ग्रामपंचायत कर्मचार्याला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी

’त्या’ ग्रामपंचायत कर्मचार्याला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी

Next
ठळक मुद्देदादा भुसे यांच्याकडे याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

पिंपळगाव बसवंत : गणेश विसर्जनप्रसंगी पिंपळगाव येथील कादवा नदीत दोन ग्रामपंचायत कर्मचारी पडले असता त्यांना वाचवून स्वत:चा जीव गमावलेल्या रवींद्र मोरे या कर्मचार्याला शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर बनकर यांनी केली आहे. कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांच्याकडे याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
पिंपळगाव बसवंत येथील रवींद्र मोरे यांच्या कुटुंबाचा वारसा शौर्याचा आहे. त्यांचे वडील सैन्य दलात होते तर भाऊ देशसेवेत कार्यरत आहेत. गणपती विसर्जन करताना जलतरण फलाटाहून पाय घसरून दोन कर्मचारी कादवा नदीत पडले असतआ त्यांना वाचवण्यासाठी रवींद्र मोरे यांनी जीवाची पर्वा न कारता पाण्यात उडी घेतली त्या दोन कर्मचार्यांना वाचवण्यात मोरे यांना यश आले. परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ते स्वत:ला वाचवू शकले नाहीत. त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे त्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी भास्कर बनकर यांनी केली आहे.

Web Title: Demand for award of gallantry award to 'that' Gram Panchayat employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.