नायलॉन मांजावर बंदी घालण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 07:18 PM2019-01-06T19:18:12+5:302019-01-06T19:18:56+5:30
येवला शहरात मकर संक्र ांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची परंपरा असून हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्र ी व वापर होत असून, त्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अपंग क्र ांती सेनेच्या वतीने शहर पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
येवला : शहरात मकर संक्र ांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची परंपरा असून हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्र ी व वापर होत असून, त्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अपंग क्र ांती सेनेच्या वतीने शहर पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या नायलॉन मांजाचा वापर सर्राससपणे होत असुन यात रस्त्यावर दुचाकी घेऊन जाणार्या नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन कराव लागत आहे, पतंग कटल्यावर तो कुठेतरी पडून जातो आण ितुटलेला मांजा लटकत राहतो.
अशा लटकनाऱ्या मांज्यामुळे वाहन धारकांचा डोळ्यासमोर अपघात होतात. त्यामुळे काही वेळी त्यांना प्राणास ही मुकावे लागते, त्यात मुक्या प्राण्यांची ही हेच हाल होत आहे. तरी शासनाने सर्व दुकानदार यांना सकत हुकुम काढून नायलॉन दोरा विक्र ी बंदी करण्यात यावी. तसेच ज्या दुकानदार कडे सदरचा नायलोन दोरा दिसेल त्याच्यावर योग्य त्या कायद्या अंतर्गत सक्त करवाई करावी. अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर प्रहार अपंग क्र ांति सेनेचे विजय परदेशी, अन्सार
शेख, शिक्त दानिश, नूर शेख, असलम शेख, अनवर शेख, यांच्या स्वाक्षर्या आहेत.