मांजाविक्रीवर बंदी आणण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:29+5:302021-01-08T04:41:29+5:30

----- अंगणवाडी सेविकांचे आयुक्तांना निवेदन मालेगाव : शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी महापालिका आयुक्त दीपक कासार यांची भेट घेऊन ...

Demand for ban on sale of cats | मांजाविक्रीवर बंदी आणण्याची मागणी

मांजाविक्रीवर बंदी आणण्याची मागणी

Next

-----

अंगणवाडी सेविकांचे आयुक्तांना निवेदन

मालेगाव : शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी महापालिका आयुक्त दीपक कासार यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे व समस्यांचे निवेदन सादर केले. पोलिओ व लसीकरण मोहिमेबाबत अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या अडचणी आहेत. बुधवारी एका शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन समस्या मांडल्या.

-----

साठ फुटी रोडवर वाहतूक कोंडी

मालेगाव : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. येथील तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर निवडणुकीचे कामकाज व प्रशिक्षण सुरू आहे. यामुळे तहसील कार्यालयाबाहेरील ६० फुटी रोडवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. दुचाकीदेखील अस्ताव्यस्त लावल्या जात आहेत. परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

-----

चंदनपुरीत गोंधळासाठी गर्दी

मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी येथे लग्नसमारंभापूर्वी होणाऱ्या गोंधळासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. सध्या दाट लग्नतिथी आहे. उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून श्री खंडोबा महाराजांना मानले जाते. या ठिकाणी गोंधळ (दिवट्या बुधल्या) करण्यासाठी गर्दी केली जात आहे.

----

उद्यानाच्या साफसफाईची मागणी

मालेगाव : येथील सोयगाव भागातील राजमाता जिजाऊ उद्यानाची पावसामुळे मोठी दुर्दशा झाली आहे. उद्यान परिसरात गवत वाढले आहे. तसेच पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे उद्यानातील खेळणी खराब झाली आहे. तसेच कारंजा परिसरात दूषित पाणी साचले आहे. या उद्यानाची साफसफाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

----

कांदा पिकावर परिणाम

मालेगाव : तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कांदा बियाण्यापासून तर कांदा लागवडीपर्यंत मजूर व इतर समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. आता बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे.

-----

इंधन दरवाढीने नागरिक त्रस्त

मालेगाव : सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक दारांनीही भाडेवाढ केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटलेली असताना इंधन व गॅसची दरवाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

----

यंत्रमाग व्यवसायावर मंदीचे सावट

मालेगाव : राजस्थान येथील पाली, बालोत्रा येथून कापडाची मागणी घटल्याने येथील यंत्रमाग व्यवसायावर मंदीचे सावट पसरले आहे. यंत्रमाग कारखानदारांची बैठक पार पडली आहे. शुक्रवारी पुन्हा बैठक होणार असून यंत्रमाग व्यवसाय काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे कामगारांचे हाल होणार आहेत.

----

हारुण अन्सारी नगरातील दुकानात चोरी

मालेगाव : शहरातील हारुण अन्सारी नगरातील ग. नं. २ मध्ये रात्री १० वाजेच्या सुमारास दुकानात जाऊन पैशांची मागणी करीत दमदाटी करून गल्ल्यातील रोकड चोरून नेल्याप्रकरणी शेख उमर शेख फारूख, रा. दातारनगर याच्या विरोधात पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली. अल्ताफ अहमद मुश्ताक अहमद, रा. हारुण अन्सारी नगर, ग. नं. २ यांनी फिर्याद दिली. फिर्यादीच्या दुकानात आरोपी उमर शेख याने कटर दाखवून पैशांची मागणी केली. दमदाटी करून गल्ल्यातील १ हजार २०० रुपयांची रोकड घेऊन पळून गेला. शिवीगाळ, दमदाटी करून दुकानाचे नुकसान केले. अधिक तपास उपनिरीक्षक उगले करीत आहेत.

----

हाजी अहमदपुरा भागातून दुचाकीची चोरी

मालेगाव : शहरातील हाजी अहमदपुरा भागातील घरासमोर लावलेली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ एएल ५८३४ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. १ जानेवारी राेजी पहाटे १ ते सकाळी पावणेआठ वाजेदरम्यान ही चोरी झाली. मोहंमद अर्शद अतहर हुसेन (२८) रा. प्लॉट नं. २५, हाजी अहमदपुरा यांनी रमजानपुरा पोलीसात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रोही करीत आहेत.

-----

साठ फुटी रोडवरून दुचाकी चोरी

मालेगाव : शहरातील ६० फुटी रोडवर देशपांडे यांच्या डोळ्यांक्या हॉस्पिटलजवळ लावलेली २० हजार रुपये किमतीची डिलक्स कंपनीची दुचाकी (क्रमांक एमएच ४१ बीए १०९४) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते पावणेसात वाजेदरम्यान ही चोरी झाली. अलीम नियाज खान, रा. शब्बीरनगर यांनी छावणी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

----

ट्रकची दुचाकीला धडक; दोन ठार

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर सायने शिवारात हॉटेल अंबिका समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार झाले. याप्रकरणी तालुका पोलिसात टाटा ट्रक क्रमांक एमपी १४ एचबी ०८४४च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोहंमद नईम मोहंमद सिद्दीकी (४७) रा. स. नं. १५, कमालपुरा यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. ४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक एमपी १४ एचबी ०८४४) वरील चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून दुचाकी क्रमांक एमएच ४१ एई ०५५२ ला धडक दिली. यात दुचाकीस्वार जुनेद नईम अहमद (२१) व त्याचा साथीदार समसुलहुदा मोहंमद आवान शहा (४५) रा. आझादनगर, धुळे हे दोघे गंभीर जखमी होऊन ठार झाले.

---

Web Title: Demand for ban on sale of cats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.