लक्ष्मीआई मंदिर उभारण्याची भोई समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:44+5:302021-08-12T04:17:44+5:30

श्री लक्ष्मीआई मंदिर समाजाला कोणत्याही प्रकारची सूचना न देता पाडण्यात आल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे या निवेदनात म्हटले आहे. ...

Demand of Bhoi community for construction of Lakshmi temple | लक्ष्मीआई मंदिर उभारण्याची भोई समाजाची मागणी

लक्ष्मीआई मंदिर उभारण्याची भोई समाजाची मागणी

Next

श्री लक्ष्मीआई मंदिर समाजाला कोणत्याही प्रकारची सूचना न देता पाडण्यात आल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे या निवेदनात म्हटले आहे. खासगी मालकाने हे मंदिर पाडले, याबाबत लवकरच बाजूला जागा देऊन मंदिराची उभारणी करून देऊ, असे सांगण्यात आले होते. मात्र, तीन महिने उलटूनही अद्याप मंदिर उभारण्याचे कोणतेच काम झाले नाही. प्रशासनाने लक्ष घालून संबंधितांना त्वरित मंदिर बांधून देण्याच्या सूचना कराव्यात, अन्यथा भोई समाज तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, नगरपालिका उपमुख्याधिकारी प्रवीण पाटील, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदींना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर समाज अध्यक्ष सुरेश खैरमोडे, उपाध्यक्ष जगदीश सोपे, शिवाजी लांडगे, संतोष सासे, दीपक काथवटे, वाल्मीक सोपे, अशोक सासे, योगेश सोपे, ज्ञानेश्वर खैरमोडे, आदींसह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो : ०९ येवला भाेई

येवला नगरपालिका उपमुख्याधिकारी प्रवीण पाटील यांना निवेदन देताना भोई समाजाचे अध्यक्ष सुरेश खैरमोडे, उपाध्यक्ष जगदीश सोपे, शिवाजी लांडगे, संतोष सासे, दीपक काथवटे, आदी.

090821\564409nsk_50_09082021_13.jpg

 फोटो : ०९ येवला भाेई येवला नगरपालिका उपमुख्याधिकारी प्रविण पाटील यांना निवेदन देतांना भोई समाजाचे अध्यक्ष सुरेश खैरमोडे, उपाध्यक्ष जगदीश सोपे, शिवाजी लांडगे, संतोष सासे, दीपक काथवटे आदी.

Web Title: Demand of Bhoi community for construction of Lakshmi temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.