कायमस्वरूपी तलाठी नेमण्याची बोपेगावच्या ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 09:33 PM2019-07-03T21:33:42+5:302019-07-03T21:34:16+5:30
दिंडोरी : बोपेगाव सजेसाठी गेली वर्षभर तलाठी उपलब्ध नसून या सजेचा अतिरिक्त कार्यभार वरखेडा सजेचे तलाठी करवंदे यांचेकडे देण्यात आलेला आहे मात्र कार्यबहुल्यामुळे वरखेडा तलाठी बोपेगाव येथे उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत असून तात्काळ कायमस्वरूपी तलाठी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी बोपेगाव ग्रामस्थानी केली आहे.

या संदर्भातउपविभागीय अधिकारी संदीप आहेर यांचेकडे निवेदन दिले असून त्याची त्वीत अंमलबजावणी न झाल्यास १ आॅगष्टपासून तलाठी कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.
दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागात बोपेगाव वगळता सर्व सजेसाठी स्वतंत्र तलाठी नियुक्त करण्यात आले असून एकमेव बोपेगाव सजेचा कार्यभार वरखेडा सजेकडे अतिरिक्त सोपविण्यात आला आहे. परमोरी, आंबेवणी, वरखेडा, घोडेवाडी या चार गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या वरखेडा सजेचे तलाठी करवंदे यांना कार्यबहुल्यामुळे बोपेगाव सजेतील बोपेगाव, सोनजांब, गोंडेगाव या गावातील ग्रामस्थांना वेळ देणे शक्य होत नाही. परिणामी बोपेगाव येथील तलाठी कार्यालयात गेले वर्षभर तलाठी उपलब्ध नाही. कामकाजासाठी ग्रामस्थांना वरखेडा येथे चकरा माराव्या लागतात. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त असून यासंदर्भात शासनाने तात्काळ बोपेगाव येथे कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा अशी मागणी सरपंच वैशाली कावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा १ आॅगष्टपासून तलाठी कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा सरपंच कावळे व ग्रामस्थांनी दिला आहे.
बोपेगाव सजअंतर्गत बोपेगाव, सोनजांब, गोंडेगाव या तीन गावांचा समावेश असून या ठिकाणी तलाठी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तलाठी उपलब्ध करून न दिल्यास कार्यालयास कुलूप लावण्याशियाय अन्य पर्याय नाही
- वैशाली कावळे, सरपंच, बोपेगाव.