बारावी बोर्डाची परीक्षा शाखानिहाय घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:11+5:302021-04-26T04:13:11+5:30

महाराष्ट्र राज्य भारतात एक नंबरचे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून २०२० मधला कोरोना विषाणूपेक्षा २०२१ चा हा विषाणू भयानक आहे. ...

Demand for branch wise examination of 12th board | बारावी बोर्डाची परीक्षा शाखानिहाय घेण्याची मागणी

बारावी बोर्डाची परीक्षा शाखानिहाय घेण्याची मागणी

Next

महाराष्ट्र राज्य भारतात एक नंबरचे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून २०२० मधला कोरोना विषाणूपेक्षा २०२१ चा हा विषाणू भयानक आहे. दुसऱ्या लाटेमध्ये विषाणूचा प्रसार फार झपाट्याने होत आहे. अनेकांना याची लागण झाली असून कुठेही बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाही. सर्व दवाखाने फुल्ल झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच आहे. महाराष्ट्र शासनाला दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तसेच १३ विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला. बारावीची परीक्षा घेण्याचे शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले. परीक्षा देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच इंजिनिअरिंग मेडिकल व इतर कोर्सेससाठी गुणवत्ता सिद्ध केल्याशिवाय त्याची सिद्धता असणे गरजेचे आहे. पण ही परीक्षा शाखानिहाय घ्यावी. म्हणजे कला, वाणिज्य व विज्ञान या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या दिवशी परीक्षा घ्यावी, अशी मागणी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा रवींद्र मोरे, सचिव प्रा. अनिल महाजन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आरोग्य संघटनेच्या मतानुसार अजून दोन-तीन महिने कोरोनाचा प्रवास राहू शकतो. शासन बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेणार आहे. दहावी व विद्यापीठाच्या परीक्षा रद्द केल्या. तसेच बारावीची परीक्षा घेताना विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची एक दिवस वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची एक दिवस कला शाखेच्या विद्यार्थ्यांची एक दिवस असे पेपर घ्यावे. प्रश्नपत्रिकेचा संच एबीसी संच देऊन परीक्षा घ्यावी जेणेकरून गोपनीयता राहील. कोरोनाचा संसर्ग होणार नाही. कारण वरिष्ठ महाविद्यालयांना जोडून असणारे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कमीत कमी सहाशे ते जास्तीत जास्त पंधराशे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ आहेत. एकाच दिवशी ही परीक्षा होणार विद्यार्थी एकाच वेळेस एकाच दिवशी परीक्षेस आल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. सुपरव्हिजन करताना काही शिक्षक बाधित मिळून आल्यास प्रश्न निर्माण होईल. ज्या त्या शाळेतच परीक्षा घ्यायचे जरी खरे आहे; पण काही कनिष्ठ महाविद्यालयात हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत तर त्या ठिकाणांची परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न आहे. जर शाखांनिहाय परीक्षा घेतली तर तर ती संख्या कमी येईल वर्गखोल्या कमी राहतील त्याचप्रमाणे सुपरव्हिजन ला शिक्षक मिळतील. परीक्षा सुरळीत पार पडेल. जेणेकरून कोरोनावर आपल्याला प्रतिबंध करण्यास मदत होईल जरी विषय डबल असेल तरी संच एबीसी ठेवले तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांची गोपनीयतादेखील राहील व कोरोनाचा फैलाव होणार नाही राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे यांच्याकडे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे मालेगाव तालुकाध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे सचिव प्रा. अनिल महाजन प्रा. दीपक सूर्यवंशी प्रा. रवींद्र शिरुडे प्रा. सुनील शिरोळे प्रा. हेमराज भामरे आदींनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Web Title: Demand for branch wise examination of 12th board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.