पिंप्रीसदो महामार्ग फाट्यावर उड्डाण पुलाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:25 PM2018-10-09T17:25:38+5:302018-10-09T17:26:15+5:30
इगतपुरी : आत्तापर्यंत शेकडो निष्पाप नागरीकांचे बळी घेणाऱ्या तालुक्यातील पिंप्रीसदो फाटा येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चौकलीवर उड्डाणपुल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत घोटी टोल प्लाझाचे प्रमुख अविनाश पवार यांना निवेदन देण्यात आले.
इगतपुरी : आत्तापर्यंत शेकडो निष्पाप नागरीकांचे बळी घेणाऱ्या तालुक्यातील पिंप्रीसदो फाटा येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चौकलीवर उड्डाणपुल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत घोटी टोल प्लाझाचे प्रमुख अविनाश पवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सदर मागणी लवकर मान्य न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा देण्यात आला. पिंप्रीसदो या भागाला सुमारे वीस पेक्षा जास्त खेडे, वाडया, पाडे जोडले आहेत. पिंप्रीसदो चौफली वरून इगतपुरी शहरात दळण वळणासाठी शासकीय, निम शासकीय, शाळा, महाविद्यालयात येणाºया जाणारे विद्यार्थी, नागरीक, महिला आदींची वर्दळ जास्त प्रमाणात आहे. महामार्ग ओलांडून शहरात येतांना येथे नेहमी लहान मोठे अपघाताचे वाढते प्रमाण जास्त असुन आजपर्यंत या ठीकाणी शेकडो निष्पाप नागरीकांचे बळी गेलेले आहेत. अनेकांना या ठीकाणी झालेल्या अपघातामुळे कायमचे अपंगत्वही आले आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुल व्हावा अशी मागणी करून सुध्दा दिरंगाई होत असल्यामुळे पुन्हा या मागणीसाठी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराअध्यक्ष नईम खान, शिवसेना महिला तालुका प्रमुख अलका चौधरी, शहर उपप्रमुख संदिप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला संघाने पिंकइंफ्रा टोल प्लाझाचे प्रमुख अविनाश पवार यांना निवेदन दिले .
यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक उमेश कस्तुरे, रमेश खातळे, उज्वला जगदाळे, मिनाबाई खातळे महीला शहर प्रमुख जयश्री जाधव, उपशहर प्रमुख सरोज राठी, विधानसभा संघटक परिमिता मेस्त्री, उपसंघटक आशा गांगुर्डे, जयश्री शिंदे े आदी उपस्थित होते.