पिंपळगावला लांब पल्ल्याच्या बसेस स्थानकात आणण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 08:24 PM2021-02-01T20:24:53+5:302021-02-02T00:52:16+5:30
पिंपळगाव बसवंत : येथे थांबा असलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस तातडीने स्थानकात आणण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने पिंपळगाव बसआगार व्यवस्थापक विजय निकम यांना देण्यात आले. दरम्यान, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, परिवहन मंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी आणि मुंबई परिवहन कार्यालयाला स्पीडपोस्टद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.

व्यापारी शहर आणि मिनी दुबई म्हणून ओळख असलेले पिंपळगाव बसवंत हे शहर खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे शहरात व्यापारी, कामगार, नोकरदार, विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे पिंपळगावहून नाशिककडे व नाशिकहून पिंपळगावकडे तसेच मालेगाव, सटाणा, धुळे, नंदुरबार, नवापूर, शहादा, इंदोर, शिरपूर, पुणे, मुंबई, कल्याण, कसारा याठिकाणचे प्रवासी मोठ्या प्रमाणात पिंपळगावला ये-जा करीत असतात. मात्र, काही बसचालकांमुळे सर्रास बस बसस्थानकात न नेता उड्डाणपुलावरून बायपास नेल्या जातात. परिणामी येथील व बाहेरील प्रवाशांचे मोठे हाल होत असून तत्काळ हा थांबा असलेल्या बसेस स्थानकात येण्याच्या सूचना कराव्यात आणि जे चालक-वाहक आपल्या कर्तव्यात कसूर करून पिंपळगाव बसस्थानकात बस न आणता बायपास घेऊन जातील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी परिपत्रक काढण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी मनसेचे नाशिक जिल्हा संघटक संजय मोरे, पिंपळगाव शहर अध्यक्ष राजेंद्र भवर, पिंपळगाव उपशहर अध्यक्ष निलेश सोनवणे, सरचिटणीस एन. के. सोनवणे, सतीश पाटील, विकास कुर्धने, महेश कोपरे आदींसह मनसैनिक उपस्थित होते.