इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 09:54 PM2020-07-02T21:54:08+5:302020-07-02T23:00:44+5:30
येवला : गत १५ दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
येवला : गत १५ दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये अन्यायकारक वाढ केल्यामुळे सामान्य जनतेचे महागाईने कंबरडे मोडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर गडगडलेले असतानाही केंद्र सरकारने सातत्याने इंधनाच्या दरात वाढ करत सामान्य जनतेची लूट चालवलेली आहे. केंद्रातील भाजप सरकारने कोरोनाच्या महामारी असताना लॉकडाऊनच्या काळात तब्बल २० ते २२ वेळा इंधनामध्ये दरवाढ केलेली आहे. तसेच सरकारने २०१४ पासून पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ केलेली आहे.
केंद्र इंधन दरवाढीच्याखाली जनतेला महागाईच्या खाईत लोटत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ही दरवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी निवेदनात देण्यात आला आहे.मालेगावी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनमालेगाव : तालुका राष्ट्रवादी पक्षातर्फे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सर्व जगात कच्च्या इंधनाचे भाव कमी होत असताना भाजप सरकार दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करत आहे.
भाजप सरकारने त्वरित पेट्रोल व डिझेलची भाव वाढ आटोक्यात आणावी व महागाई कमी करावी. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पवार, विजय पवार, दिनेश ठाकरे, सलीम रिझवी, विनोद चव्हाण, राजेंद्र पवार, धनंजय पाटील, डॉ.धिरेन्द्र चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.