वैद्यकीय परीक्षा रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:08 AM2020-05-16T00:08:59+5:302020-05-16T00:09:49+5:30
सध्या संपूर्ण जगभर कोविड-१९ या महाभयंकर महामारीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील रद्द कराव्यात अशा मागणीचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष ऋषिकेश आहेर यांच्या वतीने देण्यात आले.
नाशिक : सध्या संपूर्ण जगभर कोविड-१९ या महाभयंकर महामारीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील रद्द कराव्यात अशा मागणीचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष ऋषिकेश आहेर यांच्या वतीने देण्यात आले.
यूजीसीने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यातील अन्य शिक्षण घेणाºया प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नुकताच जाहीर केला आहे. याच अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्येदेखील परीक्षा कोणत्या पद्धतीने द्यावी, अभ्यास कसा करावा, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाºया प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आली.