येवल्यातील चालक-वाहकांची मुंबई फेरी रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:12 AM2020-11-24T00:12:33+5:302020-11-24T02:11:09+5:30
येवला : येवला आगारातील १६ कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून येवल्यातील चालक, वाहकांच्या मुंबई फेऱ्या रद्द करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य परिवहन महामंडळ यांच्यात झालेल्या प्रासंगिक कराराच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या येवला आगारातून चालक-वाहक आणि तांत्रिक कर्मचारी यांच्या फेऱ्या मुंबईसाठी लावण्यात आल्या आहेत. कोरोना महामारी काळात राज्यातील एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करत आहेत. येवला तालुक्यात कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला असून मुंबई येथून ड्यूटी करून ते पुन्हा आल्यानंतर यातील तब्बल सोळा चालक-वाहक हे कोरोनाबाधित निघाले. त्यामुळे येवला तालुक्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून संबंधित एसटी प्रशासनास येवला आगारातील चालक-वाहक व कामगार यांच्या ड्यूटी रद्द करण्याच्या सूचनावजा आदेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कर्मचारी संघटनेचे एस. के. गंडाळ, एस. आर. नागपुरे, एम. जी. सय्यद, व्ही. इन. खैरनार, एस. एम. कवडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.