भाजीबाजाराचा फेरलिलाव रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:14 AM2020-12-06T04:14:27+5:302020-12-06T04:14:27+5:30
दिनांक १० फेब्रुवारी रोजी आकाशवाणी टॉवर येथे भाजीबाजाराच्या जागेत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची नाशिक मनपाने प्रसिद्ध केलेल्या यादीत १७७ ...
दिनांक १० फेब्रुवारी रोजी आकाशवाणी टॉवर येथे भाजीबाजाराच्या जागेत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची नाशिक मनपाने प्रसिद्ध केलेल्या यादीत १७७ भाजी विक्रेत्यांची नावे होती. मात्र या यादीत अनेक वर्षांपासून पारंपरिक भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांची नावे नसल्याने ही यादी रद्द करण्यात येऊन दि. २९ जुलै रोजी आकाशवाणी भाजी विक्रेते बहुद्देशीय मित्रमंडळाच्या भाजी विक्रेत्यांना चिट्टी पद्धतीने गाळे व मोकळ्या जागा देण्यात येऊन ८ ऑगस्ट रोजी सदर जागाचा ताबा देण्यात आला, मात्र या यादीतील एकूण १४५ लोकांपैकी गाळे वाटपात २-२ गाळे वाटप झालेल्या व शेजारी-शेजारी ओटे न मिळालेल्या ९ लोकांनी काही स्थानिक नगरसेवकांना हाताशी धरून २७ नोव्हेंबर रोजी इतर भाजी विक्रेत्यांच्या अनुपस्थितीत चिठ्ठी पद्धतीने गाळ्यांची फेरवाटप प्रक्रिया राबवली. यात १०६ सदस्य भाजी विक्रेत्यांनी एफिडेव्हिट करून अन्यायी फेरलिलावास आपला विरोध दर्शविला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार व ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख यांच्या सह्या आहेत.