कृषि सन्मान योजनेतील ‘कुटुंब’ ही अट रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 02:30 PM2019-02-12T14:30:19+5:302019-02-12T14:30:43+5:30
सटाणा:शासनाने कृषि सन्मान योजनेतील कुटुंब ही अट रद्द करून शेतजमीन नावे असलेल्या खातेदाराच्या खात्यावर विनाविलंब सरसकट एकरी २१ हजार रूपये आर्थिक मदत वर्ग करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष किरण पाटील व अमोल बच्छाव यांनी तहसिलदार प्रमोद हिले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सटाणा:शासनाने कृषि सन्मान योजनेतील कुटुंब ही अट रद्द करून शेतजमीन नावे असलेल्या खातेदाराच्या खात्यावर विनाविलंब सरसकट एकरी २१ हजार रूपये आर्थिक मदत वर्ग करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष किरण पाटील व अमोल बच्छाव यांनी तहसिलदार प्रमोद हिले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत ३० जून २०१७ अखेर पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना कर्जमाफी देण्यात यावी, शेतीपंपांचे विजिबल माफ करण्यात यावे, दुष्काळी मदत देतांना कोरडवाहू बागायती असा भेदभाव न करता विनाविलंब एकरकमी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी, बागलाण तालुका गंभीर दुष्काळात असून शेतमजूरांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत बैलगोठा, शेळी गोठा, कुक्कुटपालन शेड, शिवारपांद्या आदी कामांना तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन शेतमजूरांच्या हाताला काम द्यावे, चारा छावण्यांसह प्रशासनाने शेती शिवारात सिंगलफेज योजना राबवून भीषण दुष्काळाशी सामना करणार्या तालुक्यातील शेतकºयांना दिलासा द्यावा. उपरोक्त मागणींची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सततची अवकाळी गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्णत: उध्वस्त झाला झाला आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेला व निसर्गाची अवकृपा लहरीपणा असतांनाही वाचवलेला शेतीमाल बाजारात मात्र कवडीमोल दरात विकला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाच्या दुष्काळी योजना मात्र कागदावरच आहेत. यातच केंद्र शासनाने कृषि सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादल्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी या कृषी सन्मान योजनेपासून वंचित आहेत.त्यामुळे कुटुंब ही अट रद्द करण्याची मागणी केली आहे. यावेळी युवक शहराध्यक्ष नितिन सोनवणे, सचिन जाधव, शहरउपाध्यक्ष सनिर देवरे, राजेंद्र सावकार, टोनी मोरे, मयुर अहिरे, शशी कोर, किरण वाघ, तुषार मोरे, माणिक पवार, चेतन कोठावदे, सागर शेवाळे, गणेश पगारे, यशवंत पवार, मनिष शेलार, रोहित सावंत, विकास बागूल, ओंकार बागूल, धिरज सोनवणे, योगेश अहिरे, दिपक रौंदळ, वैभव खैरनार आदी उपस्थित होते.