एचएएलमधील ५२ कामगारांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 11:06 PM2021-08-04T23:06:00+5:302021-08-04T23:07:47+5:30
ओझर टाउनशिप : येथील एचएएल व्यवस्थापनाने कारखान्यातील ५२ कामगारांच्या कानपूर, लखनऊ येथे केलेल्या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे यतीन कदम यांनी एचएएल व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
ओझर टाउनशिप : येथील एचएएल व्यवस्थापनाने कारखान्यातील ५२ कामगारांच्या कानपूर, लखनऊ येथे केलेल्या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे यतीन कदम यांनी एचएएल व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
एचएएल व्यवस्थापनातर्फे नाशिक डिव्हिजन (ओझर) कारखान्यातील सुमारे ५२ कामगारांच्या बदल्या लखनऊ, कानपूर येथे करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपचे यतीन कदम यांनी व्यवस्थापनाने ५२ कामगार बांधवांच्या केलेल्या इतर विभागात बदल्या त्वरित थांबविण्यासाठी व व्यवस्थापनास जाब विचारण्यासाठी गेटबंदचा इशारा दिला होता.
मात्र कामगार व कामगार संघटना व व्यवस्थापन यांनी विनंती केल्यामुळे ते आंदोलन रद्द करून कामगारांच्या बदल्या रद्द करण्यासाठी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले. मात्र व्यवस्थापनाने सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यतीन कदम यांनी भाजपच्या वतीने दिला आहे. यावेळी बोलताना यतीन कदम म्हणाले की, व गेल्या अनेक वर्षांपासून कामगार येथे काम करतात. त्यांची मुलं इथं शिकतात, घरात वयोवृद्ध आईवडील आहेत.
सध्या कोरोनाच्या महामारीत कामगारांची बदली दीड हजार किलोमीटरवर झाली तर निश्चितच त्या कुटुंबावर एक मोठे संकट ओढावणार आहे. जे तिकडचे कामगार स्वेच्छेने कानपूर किंवा लखनऊला जायला तयार असतील त्यांच्या बदल्या करण्यात याव्यात. यावेळी व्यवस्थापकीय अधिकारी (एचआर) जितेंद्र मोरे, राहुल मोहिते यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपचे डॉ. नामदेव पाटील, दिलीप मंडलिक, किशोर कदम, नितीन जाधव, श्रीराम आढाव, सचिन आढाव, श्रीकांत अक्कर, पुष्कर जाधव, बापू चौधरी, युवराज चौधरी, विपीन जाधव, राकेश जाधव, रामगीर गोसावी, राजू भडके, संतोष सोनवणे, श्रीकांत अक्कर, रामदास सोनवणे, युवराज शेळके, सागर शेजवळ आदी उपस्थित होते.