शेतीसाठी वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:41 AM2020-12-04T04:41:28+5:302020-12-04T04:41:28+5:30

सध्या द्राक्ष व इतर पिकांचे काम चांगल्याप्रकारे चालू असल्याने लाइटचे नियोजनाची वेळ अत्यंत चुकीची असल्याकारणाने शेतकऱ्यांवर रात्रीच्या वेळेस ...

Demand for change in timing of power supply for agriculture | शेतीसाठी वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी

शेतीसाठी वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी

Next

सध्या द्राक्ष व इतर पिकांचे काम चांगल्याप्रकारे चालू असल्याने लाइटचे नियोजनाची वेळ अत्यंत चुकीची असल्याकारणाने शेतकऱ्यांवर रात्रीच्या वेळेस काही प्रसंग ओढवू शकतो. सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष पीक अर्धवट अवस्थेत असून, त्याला खत,पाणी याच कालावधीत जास्त प्रमाणात द्यावे लागते. तसेच इतर पिकांच्या बाबतीत रात्रीचे पाणी देणे अत्यंत घातक आहे. सध्या ऊस पिकाची तोडणी ७० ते ८० टक्के बाकी आहे. त्यामुळे शेतात काही ठिकाणी बिबट्याचा वावर आहे. घरातील वयोवृद्धांना किंवा त्यांच्या मुलांना अशा रात्रीच्या वेळी पाणी भरण्यास जावे लागते. आत्ताच मागील आठवड्यात विजेचा धक्का लागून तीन भावांचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यासंबंधीचे निवेदन दिंडोरी महाविद्युत वितरण कंपनीला वलखेड व परिसरातील शेतकऱ्यांनी दिले. तालुक्यातील कंपन्यांना चोवीस तास वीजपुरवठा केला जातो, परंतु देशाला अन्नपुरवठा करणाऱ्या बळीराजाला मात्र वीज देताना योग्य प्रकारे न्याय मिळत नाही. दिंडोरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा विचार करून वीजपुरवठ्याची वेळ बदलावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे

इन्फो

विधानसभा उपाध्यक्षांना साकडे

या प्रकरणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही शेतकऱ्यांनी साकडे घातले. त्यांना नाशिक महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांची बैठक बोलावून सध्याची परिस्थिती जाणून घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे थ्री फेज वीजपुरवठ्याची वेळ बदलण्याची विनंती केली.

फोटो- ०३ दिंडोरी लाइट

महावितरणचे अभियंता राऊत व मोरे यांना निवेदन देताना माजी सरपंच रघुनाथ पाटील, पोलीस पाटील वामन पाटील, वलखेड व परिसरातील शेतकरी बांधव.

===Photopath===

031220\03nsk_32_03122020_13.jpg

===Caption===

महावितरणचे अभियंता राऊत व मोरे यांना निवेदन देताना माजी सरपंच रघुनाथ पाटील ,पोलिस पाटील वामन पाटील,वलखेड व परिसरातील शेतकरी बांधव.

Web Title: Demand for change in timing of power supply for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.